लालकृष्ण अडवाणी हे प्रगल्भ नेते असून, माझ्या मते त्यांच्याकडेच नेतृत्त्वाची धुरा दिली पाहिजे. नेतृत्त्व करण्यामध्ये त्यांच्या इतक्या ताकदीचा दुसरा कोणताच नेता नाही… हे मत आहे भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे. पाटण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर मोदी आणि अडवाणी या दोन्ही नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्त्व करण्यावरून सुरू झालेल्या छुप्या वादामध्ये भर घालण्याचे काम पक्षाचेच काही नेते करीत आहेत. यामध्ये मंगळवारी शत्रुघ्न सिन्हा यांची भर पडली.
नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते आहेत. त्यांना पक्षाच्या संसदीय मंडळाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यास मी त्याचे स्वागतच करेन. तरीही मला असे वाटते की, अडवाणी यांच्याकडेच नेतृत्त्व करण्याची धुरा सोपविली गेली पाहिजे. अडवाणी हे प्रगल्भ नेते असून, त्यांचासारखा दुसरा कोणताही नेता नाही. त्यांनी स्वतः कधीही पंतप्रधानपदाची मागणी केलेली नाही. संसदीय मंडळ कोणालाही पंतप्रधानपदाची उमेदवारी देऊ देत. त्या व्यक्तीला अडवाणीचे आशीर्वाद मिळायला हवेत, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
अडवाणींच्या ताकदीचा दुसरा नेता नाही – शत्रुघ्न सिन्हांचा मोदींवर निशाणा
लालकृष्ण अडवाणी हे प्रगल्भ नेते असून, माझ्या मते त्यांच्याकडेच नेतृत्त्वाची धुरा दिली पाहिजे. नेतृत्त्व करण्यामध्ये त्यांच्या इतक्या ताकदीचा दुसरा कोणताच नेता नाही... हे मत आहे भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे.
First published on: 23-07-2013 at 07:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha takes dig at narendra modi