आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी गठित करण्यात आलेल्या बिहारमधील भाजपच्या संसदीय निवडणूक समितीमधून अभिनेते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांना स्थान देण्यात आलेले नाही. गेल्या काही काळापासून पक्षाबाबत आक्रमक विधाने केल्यामुळे शत्रुघ्न यांना बाजूला सारल्याची चर्चा रंगू लागली आहे.
लोकसभेसाठी उमेदवार निवडण्याची जबाबदारी संसदीय निवडणूक समितीवर आहे. या समितीत पटना साहेब मतदारसंघातून खासदार असलेल्या सिन्हा यांना स्थान देण्यात आलेले नाही. ३१ सदस्यांचा समावेश असलेल्या या समितीत प्रदेश अध्यक्ष मंगल पांडे, माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सी पी ठाकूर आदींचा समावेश आहे. त्याशिवाय राष्ट्रीय नेते रवीशंकर प्रसाद, राजीव प्रताप रुडी, सईद शहानवाझ हुसेन यांचा निमंत्रित म्हणून या समितीत समावेश करण्यात आला आहे.
या समितीमधून शत्रुघ्न सिन्हा यांना वगळण्याच्या आरोपाचे पक्षाच्या नेत्यांनी खंडन केले आहे. शत्रुघ्न सिन्हा हे पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांना राज्यातील छोटय़ाशा समितीवर न घेण्याच्या मुद्दय़ाला इतके महत्त्व देण्याची गरज नाही. शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे दुर्लक्ष केलेले नाही, तर त्यांची राष्ट्रीय स्तरावर अधिक गरज असल्याची सारवासारव सुशीलकुमार मोदी यांनी केली. शत्रुघ्न सिन्हा हे पक्षाचे महत्त्वाचे निवडणूक प्रचारक आहेत. , असे प्रदेश अध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितल़े
भाजपच्या निवडणूक समितीतून शत्रुघ्न सिन्हांना वगळले
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी गठित करण्यात आलेल्या बिहारमधील भाजपच्या संसदीय निवडणूक समितीमधून अभिनेते
First published on: 12-01-2014 at 01:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinhas omission from bjp committee raises eyebrows