उत्तराखंडात अतिवृष्टीमुळे झालेला हाहाकार पाहता अभिनेते व नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीतून पुरग्रस्तांना अन्नधान्यच्या रुपातून मदत होईल. त्याचबरोबर शत्रुघ्न सिन्हा यांनी इतर राजकीय नेत्यांना स्वत:पुढाकार घेऊन मदत करण्याचे आवाहन केले आहे. ” मी माझ्या निधीतून ५० लाख रुपयांची मदत पुरग्रस्तांसाठी देण्य़ाचा निर्णय घेतला आहे. इतरही नेत्यांनी त्यांच्या निधीतून मदत जाहीर करावी.” असे लोकसभा सदस्य शत्रुघ्न सिन्हा पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
उत्तराखंडमध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला पुर याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावे अशी मागणीही सिन्हा यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2013 रोजी प्रकाशित
शत्रुघ्न सिन्हांची उत्तराखंड पुरग्रस्तांना ५० लाखांची मदत
उत्तराखंडात अतिवृष्टीमुळे झालेला हाहाकार पाहता अभिनेते व नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीतून पुरग्रस्तांना अन्नधान्यच्या रुपातून मदत होईल.

First published on: 20-06-2013 at 03:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan to donate rs 50 lakh for uttarakhand rain victims