गाझियाबादमधील आम आदमी पक्षाच्या उमेदवार शाजिया इल्मी यांनी केलेल्या एका विधानामुळे पक्ष अडचणीत आला आहे. मुस्लिमांनी जातीयवादी बनले पाहिजे, अशा आशयाचे विधान शाजिया इल्मी यांनी केल्याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर आहे. हे विधान त्यांनी नेमके कधी, कुठे केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या विधानाचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता असल्याचे लक्षात आल्यावर तातडीने आम आदमी पक्षाने इल्मी यांच्या विधानाशी पक्ष अजिबात सहमत नसल्याचे म्हटले आहे.
पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इल्मी यांनी व्यक्त केलेल्या विधानाशी पक्ष सहमत नाही आणि त्यांच्या विधानाचा पुरस्कारही करीत नाही. पक्षाच्या सर्व नेत्यांनी कोणतेही विधान करण्यापूर्वी त्यातून कोणताही गैरसमज होऊ नये, याची काळजी घ्यावी.
इल्मी काही मुस्लिम लोकांमध्ये बसून गप्पा मारताना त्यांनी हे विधान केल्याचे व्हिडिओतून दिसते. त्या म्हणतात, निधर्मी असण्यापेक्षा मुस्लिमांनी अधिक जातीयवादी असायला हवे. मुसलमान आपल्या माणसांना मत देत नाहीत. अरविंद केजरीवाल आपले आहेत. तुम्ही लोकं इतके निधर्मी होऊ नका. यावेळी आपल्या घराचाच विचार करा. तुम्ही तुमच्याच फायद्याचा विचार करा. हे जरी वादग्रस्त असले, तरी तेवढेच गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा