Kolkata Rape : कोलकाता येथील के आरजी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार ( Kolkata Rape ) करण्यात आला, त्यानंतर तेवढ्याच क्रूरतेने तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर आता पीडितेच्या वडिलांचं दुःख समोर आलं आहे. माझी मुलगी ओपीडीमध्ये काम करत होती. पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत कुणीही तिला बोलवलं नाही किंवा कुणीही ती कुठे आहे हे बघायलाही गेलं नाही याचं मला खरंच आश्चर्य वाटतं आहे असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. वडिलांनी केलेल्या या दाव्यामुळे मेडिकल कॉलेजवर प्रश्न उपस्थित आहेत.
कोलकाता पीडितेच्या आई वडिलांनी काय म्हटलं?
पीडितेच्या आई-वडिलांनी सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो या घटनेचा तपास करत आहे) सांगितलं की, रुग्णालयातील काही इंटर्न व डॉक्टर या गुन्ह्यात सहभागी असू शकतात. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. यासह मृत तरुणीच्या ( Kolkata Rape ) आई-वडिलांचा ज्या-ज्या लोकांवर संशय़ आहे त्यांच्या नावांची यादी त्यांनी सीबीआयला दिली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंततर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.
कोलकाता पीडितेचे वडील नेमकं काय म्हणाले?
” माझी मुलगी पहाटे ३ ते सकाळी १० या वेळेत ओपीडी ड्युटीवरच होती. सहा ते सात तासांत कुणालाही डॉक्टर म्हणून ती कुठे आहे हे विचारावंसं वाटलं नाही? किंवा कुणीही माझी मुलगी कुठे गेली आहे? हे पाहिलं नाही. याला नेमकं काय म्हणता येईल? मी हा विचार करुन करुन हैराण झालो आहे, मला काही सुचेनासं झालं आहे. माझी मुलगी ओपीडीत काम करत होती. ती आमच्याशी फोनवर बोलायची. अनेकदा सांगायची इतकं काम आहे की जेवायलाही वेळ नाही. मग सात तास तिच्याकडे ( Kolkata Rape ) कुणीही कसं पाहिलं नाही? किंवा तिच्याबद्दल कुणीच कशी चौकशी केली नाही?” असे उद्विग्न करणारे प्रश्न पीडितेच्या वडिलांनी उपस्थित केले आहेत.
सीबीआय तपासाबाबत काय म्हणाले पीडितेचे वडील?
पीडितेचे वडील पुढे म्हणाले, “सीबीआयकडे प्रकरण दिलं आहे. मी याबाबत काय सांगणार? मला त्याबाबत काही माहिती नाही. त्या लोकांना ते त्यांच्या परिने तपास करती. मला माहीत आहे की जे आंदोलन करत आहेत ते माझ्या मुलीच्या बाजूने उभे आहेत. मात्र सीबीआय तपासाबाबत मी काहीही सांगू शकत नाही.” असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलं आहे. तसंच माझ्या मुलीवर अन्याय ( Kolkata Rape ) झाला पण देशाने त्याची दखल घेतली. त्यामुळे मला माझं धैर्य वाढल्यासारखं वाटतं आहे असंही पीडितेचे वडील म्हणाले.