पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या. मात्र त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यामुळे एकाही पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नव्हते. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा चालू होती. आघाडीवर एकमत झाल्यानंतर पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ (७२) यांची दुसऱ्यांदा घोषणा करण्यात आली आहे. ३३६ सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात दोन्ही पक्षांचे २०१ सदस्य आहेत. त्यामुळे शाहबाज शरीफ यांची एकमताने पंतप्रधानपदी निवड करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अग्रलेख: बदमाषांतले शरीफ!

शाहबाज शरीफ यांना आव्हान देणारे ओमर आयुब खान यांना केवळ ९२ सदस्यांचा पाठिंबा मिळू शकला. ओमर आयुब हे कारावासात असलेल्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे नेते आहेत. शाहबाज शरीफ सोमवारी राष्ट्रपतींचे निवास्थान ऐवान-ए-सदर येथे पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

शाहबाज शरीफ यांनी यापूर्वी एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान आघाडीच्या सरकारमध्ये पंतप्रधानपद भूषिवले होते. आज राष्ट्रीय विधिमंडळाचे अध्यक्ष सरदार अयाझ सादीक यांनी शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करताच शाहबाज यांनी त्यांचे मोठे बंधू माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना मिठी मारली. नवाज शरीफ हे तीनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधान होते.

आपल्या विजयाच्या भाषणात बोलत असताना शाहबाज शरीफ म्हणाले, माझे बंधू (नवाज शरीफ) तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. त्याकाळात झालेला पाकिस्तानचा विकास सर्वांनाच माहीत आहे. नवाब शरीफ यांनी विकसित पाकिस्तानचा पाया रचला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shehbaz sharif becomes pakistans prime minister for a second time kvg