Sheikh Hasina Meets Ajit Doval News in Marathi : बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (५ ऑगस्ट) सकाळी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळाने आंदोलकांनी शेख हसीना यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. तत्पूर्वी शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन केलं. दरम्यान, बांगलादेशमधून निघाल्यानंतर त्या कुठे गेल्या असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, काही तासांत त्याचं उत्तर मिळालं. शेख हसीना भारतात दाखल झाल्या. बांगलादेशच्या वायूसेनेच्या एका विमानाने त्या गाझियाबादमधील भारतीय वायूसेनेच्या हिंडन या एअरबेसवर (वायूदलाचा तळ) दाखल झाल्या.

हिंडन एअरबेसवर त्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांना भेटल्या. तसेच त्यांनी भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. सध्या भारतीय वायूदल आणि भारतीय संरक्षण यंत्रणा शेख हसीना यांना सुरक्षा प्रदान करत आहे. त्यांना भारतात सुरक्षित स्थळी नेलं जात आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

पुढची रणनीती काय?

सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू झालं. या आंदोलनाचं हिंसाचारात रुपांतर झालं असून हा हिंसाचार थेट बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचला. त्यामुळे शेख हसीना यांनी देशाचं प्रमुखपद व देश सोडून पलायन केलं. त्या आता भारतात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, काही वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की शेख हसीना या भारतमार्गे लंडनला जाणार आहेत. भारतीय वायू सेना यामध्ये त्यांची मदत करेल असंही म्हटलं जात आहे.

हे ही वाचा >> Bangladesh Protests : बांगलादेशच्या घडामोडींचे भारतातही पडसाद, सीमेवर बंदोबस्त वाढवला, रेल्वे सेवा तात्पुरती रद्द

काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या अहवालानुसार बांगलादेशमधील सध्याच्या स्थितीवर नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची बैठक चालू आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, एनएसए प्रमुख अजित डोभाल, संरक्षण यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी व गुप्तचर विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत. यापूर्वी देखील नवी दिल्लीत बांगलादेशमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अशीच एक बैठक झाली होती. मात्र आताची परिस्थिती अधिक गंभीर आहे. तसेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना मदतीसाठी भारतात दाखल झाल्या आहेत. शेख हसीना यांना लंडनला कसं पोहोचवायचं यावर आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

हे ही वाचा >> Video: शेख हसीना यांच्या घरात आंदोलकांचा धुडगूस; बेडवर झोपले, किचनमधील बिर्याणीवर मारला ताव, मासे पळवले

आंदोलकांनी शेख हसीना यांचं कार्यालय जाळलं

दरम्यान, बांगलादेशमध्ये चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. आंदोलकांनी शेख हसीना यांचं कार्यालयही जाळलं आहे. हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेच्या लष्करांने प्रशासनावर तात्पुरता ताबा घेतला आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं. यानंतर सध्या बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बांगलादेशमधील इंटरनेट सेवा देखील अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.