दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची केरळच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. तीनच महिन्यांपूर्वी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रपती भवनच्या प्रवक्तयाने म्हटले आहे, की श्रीमती दीक्षित या निखिलकुमार यांची जागा घेतील. ते पूर्वी दिल्लीचे पोलिस आयुक्त होते व आता त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांनी राज्यपालपदाची सूत्रे घेतली होती. कुमार हे यापूर्वी ऑक्टोबर २००९ मध्ये नागालँडचे राज्यपाल होते. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतल्यानंतर श्रीमती दीक्षित यांना हा निर्णय कळवण्यात आला होता. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा नवी दिल्ली मतदारसंघात दारुण पराभव केला होता
केरळच्या राज्यपालपदी शीला दीक्षित यांची नेमणूक
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची केरळच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. तीनच महिन्यांपूर्वी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता
First published on: 05-03-2014 at 08:29 IST
TOPICSशीला दीक्षित
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheila dikshit appointed governor of kerala