काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू असतानाच दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी जाहीर तोफ डागत त्यांच्या नेतृत्व क्षमतेविषयीच शंका व्यक्त केली आहे. राहुल यांच्या नेतृत्वगुणांविषयी अनेक शंका आहेत, त्यामुळे सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदी कायम रहावे असे त्यांनी सांगितले. शीला यांच्या या वक्तव्यांनी खळबळ उडाल्यानंतर मात्र त्यांनी तात्काळ घूमजाव करीत, आपण राहुल यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केलीच नाही, असा दावा केला.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला मोकळे वाटते, सोनिया गांधी यांचे आक्रमक व यशस्वी नेतृत्वच पक्षाच्या पुनरूज्जीवनासाठी आवश्यक आहे. त्या ही जबाबदारी टाळणार नाहीत आणि हे आव्हान ठामपणे पेलतीलच, असा विश्वास दीक्षित यांनी आधी व्यक्त केला होता.
पुढे काय होईल वा काय होणार नाही, हे मी सांगू शकत नाही, पण राहुल यांच्या नेतृत्वगुणांविषयी शंका आहेत, त्यांची कसोटीही लागलेली नाही त्यामुळे सोनिया गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे. सोनियांच्या नेतृत्वावर टीका करणारी व्यक्ती आपल्याला अजून भेटलेली नाही, हे आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो पण  राहुल यांच्याबाबत प्रश्नचिन्ह आहे कारण त्यांचे काम बघायला मिळालेले नाही, अशी टिप्पण्णी दीक्षित यांनी केली होती.
काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंग व शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनीही उघडपणे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल यांच्याबाबत काँग्रेस अनभिज्ञ!
नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारी परतणार असल्याबाबत काँग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी मंगळवारी अनभिज्ञता व्यक्त केली. रविवारी जमीन अधिग्रहण विधेयकाविरोधी सभेत राहुल सहभागी होणार असल्याचे याआधी काँग्रेस नेत्यांनी जाहीर केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheila dikshit question on rahul leadership ability