विधानसभा निवडणुकीत तोंडावर आपटल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांचा २२ हजार मतांनी पराभव करून, त्यांचा नव्या विधानसभेतील प्रवेशही रोखला.  दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला मतदारांनी झिडकारले असून, भारतीय जनता पक्ष आणि नव्याने उदयाला आलेल्या आम आदमी पक्षाच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.
दिल्लीत गेल्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४३ जागा जिंकून सत्ता स्थापन करणाऱया कॉंग्रेसला या निवडणुकीत दुहेरी आकडाही गाठता येईल की नाही, याची शंका आहे. आम आदमी पक्षाने लक्षवेधक कामगिरी करून दुसरा क्रमांक पटकावल्यामुळे कॉंग्रेसच्या हातून विऱोधी पक्ष नेतेपदही गेले आहे. कॉंग्रेसला या निवडणुकीत तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागणार आहे. भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ असल्याने परिस्थितीचा विचार करून शीला दीक्षित यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा