इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईनतर्फे मेघालय टुरिझमच्या सहकार्याने अ‍ॅडव्हेंचर टुरिझम मीट अर्थात ATM 2024 चं आयोजन करण्यात आलं आहे. शिलाँग या निसर्गरम्य शहरामध्ये ही मीट आयोजित करण्यात आली असून या एकदिवसीय कार्यक्रमात पर्यटन क्षेत्रातील मान्यवर, साहसी पर्यटक आणि या क्षेत्राशी संबंधित इतर महत्त्वाच्या व्यक्ती चर्चा, कार्यशाळा व सांस्कृतिक सादरीकरणाच्या निमित्ताने एकत्र येतील.

या कार्यक्रमाचे आयोजन शिलाँग येथील राज्य संमेलन केंद्रात केले जाणार असून, देशभरातील प्रमुख वक्ते व पॅनेलिस्ट या चर्चेत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील अ‍ॅडव्हेंचर टुरिझमच्या असंख्य संधी शोधणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. यामध्ये प्रामुख्याने मेघालय केंद्रस्थानी असेल. मेघालय टुरिझमसोबतच, इन्क्रेडेबल इंडिया, ओडिशा टुरिझम, उत्तराखंड टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड, बोडोलँड टुरिझम आणि उत्तर प्रदेश टुरिझम यांचाही या कार्यक्रमासाठीचा हातभार मोठा आहे.

upi
त्रिनिदाद-टोबॅगोमध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Job Opportunity Opportunities in CISF
नोकरीची संधी: ‘सीआयएसएफ’मधील संधी
cyber crimes on name of increasing subscriber likes and followers on social media
सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची बातमी… लाईक्स, फालोअर्स आणि सबस्क्राईबर…
what is quad grouping
QUAD संघटना नेमकी काय आहे? भारतासाठी या संघटनेचे महत्त्व काय?
TISS, Progressive Students Forum, TISS lifted ban,
मुंबई : अखेर विद्यार्थ्यांचा विजय… ‘टीस’ने प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमवरील बंदी उठवली
dharavi re devlopment ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
धारावीत लवकरच पाच नमुना सदनिका; पात्र रहिवाशांसह अपात्र, पात्र लाभार्थींना घरांविषयी माहिती
best bus rescue, best bus,
Best Bus : मुंबईकरांच्या ‘बेस्ट’ बचाव अभियानाचे देखावे

ATM 2024 ची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभाने होणार आहे. मेघालयचे पर्यटन मंत्री बाह पॉल लिंगदोह हे या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असतील. त्याव्यतिरिक्त मेघालय पर्यटन विभागाचे सचिव डॉ. विजय कुमार डी. व ओडिशाच्या उपमुख्यमंत्री श्रीमती प्रवती परिडा या कार्यक्रमाच्या गेस्ट ऑफ ऑनर असतील.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी भारतातील साहसी पर्यटनाची आणि त्यातील प्रचंड शक्यतांची माहिती, ज्ञानाची देवाण-घेवाण अशा गोष्टींची ही उत्तम संधी असेल. एटीएम २०२४चे काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

पॅनल चर्चासत्रे

या कार्यकर्मात ‘साहसी पर्यटनाद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थांचे पुनरुज्जीवन’ आणि ‘साहसी पर्यटनातील राज्य सरकारांची भूमिका’ यांसारख्या विषयांवर केंद्रित तज्ञ-नेतृत्वाखालील सत्रे आयोजित केली जातील. यावेळी या क्षेत्रातील तज्ज्ञ सध्याच्या आणि भविष्यातील साहसी पर्यटनाबाबत त्यांचे सखोल विचारदेखील मांडतील.

प्रमुख सत्रे

अ‍ॅडव्हेंचर टुरिझमच्या मदतीने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना : ग्रामीण व काही अपरिचित भागांमध्ये अ‍ॅडव्हेंचर टुरिझममुळे आर्थिक वाढ कशी साधता येऊ शकते, यावर या चर्चासत्राचा भर असेल.

अ‍ॅडव्हेंचर टुरिझममध्ये राज्य सरकारांची भूमिका: या सत्रात अ‍ॅडव्हेंचर टुरिझमच्या पायाभूत सुविधा आणि धोरणे विकसित करण्यात राज्य सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका कशी असते, यावर विचारमंथन होईल.

मेघालयातील साहसी पर्यटनाच्या अमर्याद संधी: या सत्रात मेघालयातील अ‍ॅडव्हेंचर टुरिझमच्या असंख्य संधींवर चर्चा केली जाईल.

अ‍ॅडव्हेंचर टुरिझममधील महिलांची भूमिका: या सत्रात साहसी पर्यटनात महिलांच्या योगदानाचा गौरव केला जाईल, ज्यात श्रीमती शेली दियांगडोह (सर्टिफाईड केव्हर) आणि श्रीमती वन्सुक मिरथाँग (एव्हरेस्टवीर) यांचा समावेश असेल.

विशेष सादरीकरणे:

मेघालयातील गुफा पर्यटन: नावाजलेले साहसी पर्यटक ब्रायन खारप्राण डॅली हे मेघालयाच्या रहस्यमय गुहांवर आधारित सादरीकरण करतील. यामध्ये मेघालयमधील अतुलनीय अशा केव्हिंग टुरिझमवर भाष्य केलं जाईल

एक साहसी प्रवाशाची कहाणी: आयबेक्स एक्स्पिडिशनचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मनदीप सिंगसोईन यावेळी दुपारच्या सत्रात जबाबदार साहसी पर्यटनाबाबत सादरीकरण करतील. त्याचवेळी त्यांचे काही अनुभवही सांगतील.

कार्यशाळा

दुपारच्या सत्रामध्ये साहसी पर्यटन आयोजक व मार्गदर्शकांसाठी कौशल्य विकास कार्यशाळेचं आयोजन केलं जाईल. यामध्ये जबाबदार साहसी पर्यटन व सुरक्षेसंदर्भातील मार्गदर्शनाचा समावेश असेल.

सांस्कृतिक कार्यक्रम

मेघालयच्या संपन्न संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं यावेळी आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विविध प्रकारच्या सादरीकरणांमधून मेघालयचा उज्ज्वल सांस्कृतिक वारसा उपस्थितांसमोर मांडण्याचा प्रयत्न असेल.

शाश्वत साहसी पर्यटनाच्या धोरणांवर व्यापक चर्चा, सरकारी व खासगी क्षेत्र यांच्यातील वाढते सहकार्य आणि भारतातील साहसी पर्यटनाच्या विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी शिलाँग येथे होणारी अ‍ॅडव्हेंचर टुरिझम मीट ही या क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी महत्त्वाचं व्यासपीठ ठरेल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना तज्ज्ञांशी संवाद साधण्याची, त्यांच्या कल्पना मांडण्याची आणि साहस पर्यटनाचं भविष्य घडवण्यात हातभार लावण्याची संधी मिळू शकेल. भारातील साहसी पर्यटन क्षेत्रासाठी एटीएम २०२४ हा कार्यक्रम मैलाचा टप्पा ठरेल असं आम्ही वचन देतो. यातून विविध घटकांमधील भागीदारीला प्रोत्साहन मिळणे आणि शाश्वत व जबाबदार पर्यटनाच्या नवनव्या संधी शोधणं शक्य होऊ शकेल. ईशान्य भारतातील पर्यटन क्षेत्रातील अनेक दिग्गज व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम नक्कीच नव्या कल्पना व त्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रोत्साहन देणारा ठरेल. यातूनच मेघालय, पूर्वेकडील इतर राज्ये व संपूर्ण भारतातील पर्यटनाचं भविष्य घडू शकेल.

अ‍ॅडव्हेंचर टुरिझमचं भवितव्य व शाश्वत वृद्धी अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी संवाद घडवून आणण्यासाठी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडियाची बांधीलकीच एकप्रकारे या अभिनव अ‍ॅडव्हेंचर टुरिझम मीट २०२४मधून स्पष्ट होत आहे!