केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वी रविवारी पाटण्यामध्ये गांधी मैदानावर साखळी बॉम्बस्फोट झाले. त्याच दिवशी संध्याकाळी शिंदे मुंबईमध्ये ‘रज्जो’ या चित्रपटाच्या संगीत अनावरण कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावरून भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ‘१० जनपथ’ येथे २० मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्याचा नेमका तपशील समजू शकलेला नाही. प्रशासकीय कारभाराकडे लक्ष न देणे ही केंद्रीय मंत्र्यांची सवयच झाली असल्याची टीका भाजपने शिंदे यांच्यावर केली होती.

Story img Loader