संघ आणि भाजपच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याच्या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाचे मंगळवारी त्यांच्या गृहखात्याने ‘पुराव्यां’दाखल समर्थन केले आणि परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनीही शिंदे यांचे वक्तव्य तथ्यांवर आधारित असल्याचा दावा केला. पण आपला पक्ष दहशतवादाला धर्माशी जोडून बघत नसल्याची सारवासारव काँग्रेसने केली.
दुसरीकडे, हिंदू दहशतवादाशी संघ आणि भाजपचा संबंध जोडणारे शिंदे यांचे विधान चुकीचे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली. हिंदू  दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद या शब्दांशी काँग्रेस पक्ष सहमत नाही. दहशतवादाचा रंग नसतो आणि कोणत्याही धर्माशी त्याचा संबंध जोडणे योग्य नाही. भगव्या रंगाविषयी काँग्रेसला आक्षेप असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कधी कधी एखादी गोष्ट चुकून तोंडून बाहेर पडते, अशी सारवासारव करीत काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी हा वाद आता संपुष्टात आणावा, असे आवाहन केले.
संघ आणि भाजपचा हिंदू अतिरेक्यांशी संबंध लावणाऱ्या शब्दांचा वापर केवळ चुकीचाच नाही तर अयोग्य आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी येथे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा