भारतीय संरक्षण यंत्रणांनी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरावर एक जहाज अडवलं आहे. हे जहाज चीनवरून पाकिस्तानला जात होतं. अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं की, भारताच्या संरक्षण यंत्रणेला गुप्तचर विभागाने सांगितलं होतं की, चीनवरून कराचीला जाणाऱ्या या जहाजात काही संशयास्पद वस्तू आणि शस्त्रास्रं असावीत. या माहितीच्या आधारावर न्हावा-शेवा बंदराजवळ हे संशयास्पद जहाज रोखण्यात आलं. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारावर नौदलाने हे जहाज अडवलं असून यामध्ये आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्र कार्यक्रमासाठी लागणारी सामग्री सापडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वस्तू या जहाजात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईवेळी डीआरडीओचे अधिकारीदेखील न्हावा-शेवा बंदरात उपस्थित होते. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित जहाज भारतीय बंदराजवळ आढळल्याने जगभर खळबळ उडाली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पथकाने चीनवरून पाकिस्तानला जाणाऱ्या या जहाजावर असलेल्या कार्गोंमधील मालाची तपासणी केली. तपासणीनंतर डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पाकिस्तान या मालाचा वापर अणू कार्यक्रमासाठी करू शकतो. बॅलेस्टिक क्षेपणास्रं बनवण्यासाठी लागणारा मालही या कार्गोंमध्ये आहे.

हे ही वाचा >> BJP Candidate List : भाजपाची १६ राज्यांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर, पंतप्रधान मोदी वाराणसीतून लोकसभा लढवणार

या जहाजावर इटालियन कंपनीने बनवलेली कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (सीएनसी) मशीन सापडली आहे. डीआरडीओचं पथक सध्या या मशीनची तपासणी करत आहे. डीआरडीओने सांगितलं आहे की, ही मशीन पूर्णपणे कॉम्प्युटरद्वारे नियंत्रित केली जाते. या मशीनचा क्षेपणास्रं निर्मितीच्या कामात वापर केला जातो. तसेच या संपूर्ण कन्साईन्मेंटमध्ये (जहाजाची खेप) आण्विक शस्त्र आणि क्षेपणास्र निर्मितीसाठी वापरले जाणारे महत्त्वाचे पार्ट्स आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ship from china to pakistan stopped at mumbai port suspected nuclear cargo asc