पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाने पक्षाच्या धोरणांमध्ये मोठे बदल केले आहेत. पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी ‘एक कुटुंब, एक तिकिट’ हे धोरण जाहीर केले आहे. नव्या धोरणानुसार पक्षातील महिला आणि तरुणांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. पक्षातील ५० वर्षांखालील सदस्यांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती बादल यांनी दिली आहे. पुढच्या पिढीत नेतृत्व तयार करण्यासाठी पक्षातील हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत, असे बादल म्हणाले आहेत.
काँग्रेस केवळ भावा-बहिणीचा पक्ष- नड्डा
निवडणूक प्रणालीद्वारे पक्षाची नव्याने संघटनात्मक रचना करण्यात येणार आहे. या रचनेवर केंद्रीय निवडणूक समितीकडून देखरेख ठेवण्यात येणार आहे. “शिरोमणी अकाली दल नव्या संघटनात्मक रचनेसह पक्षाच्या मूळ तत्वांवर कायम राहणार आहे. राज्यात शांती आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना आणि आध्यात्मिक मान्यता असलेल्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न आहे”, अशी प्रतिक्रिया पक्षातील या बदलांनंतर सुखबिर सिंग बादल यांनी दिली आहे. गरीब, शेतकरी आणि मजूर यांच्या सेवेसाठी गेल्या १०२ वर्षांपासून शिरोमणी अकाल दल कार्यरत आहे. राज्यातील जनतेसाठी यापुढेही हा पक्ष तत्पर राहील, असे पत्रकार परिषदेला संबोधित करताना बादल म्हणाले आहेत.
भाजपात तुम्ही नाराज आहात का? पंकजा मुंडेंचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…
राज्यात शिरोमणी अकाली दलाची सत्ता स्थापन झाल्यास राज्य आणि जिल्हा स्तरावरील पदांसाठी सामान्य कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. या पदांसाठी आमदार किंवा खासदारांच्या कुटुंबीयांचा विचार केला जाणार नाही, असे बादल यांनी सांगितले आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष निवडणूक लढवू शकणार नाहीत, असेही पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहेत. पक्षाच्या नव्या संघटनात्मक रचनेसाठी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये ११७ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय समाजातील नागरिकांना पक्षात सर्व स्तरांवर प्रतिनिधित्व दिले जाईल, असेही बादल यांनी जाहीर केले आहे. पक्षाच्या अध्यक्षांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील विचारवंत आणि जाणकार व्यक्तींचा समावेश असलेले सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येईल, अशी माहिती बादल यांनी दिली आहे.