शिवसेना कुणाची याचा वाद निवडणूक आयोगात सुरू आहे. कपिल सिब्बल हे ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक आयोगात बाजू मांडत आहेत. जी फूट पडली आहे ती कपोलकल्पित आहे असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगात शिवसेना कुणाची यावर युक्तिवाद सुरू आहे. याआधी १० तारखेला सुनावणी झाली होती. त्या सुनावणीत महेश जेठमलानी यांनी आमच्याकडे संख्याबळ आहे असं म्हटलं होतं. आज कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा खोडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे कपिल सिब्बल यांनी?


उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे कपोलकल्पित आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने जे दावे मागच्यावेळी केले होते ते आज कपिल सिब्बल यांनी खोडून काढले. तसंच मूळ शिवसेना आम्हीच आहोत आणि शिवसेनेत जी काही फूट पडल्याचं बोललं जातं आहे त्याचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. ही फूट मुळीच ग्राह्य धरू नये असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे गटाचा दावा काय होता?


आमच्याकडे आमदार आणि खासदार यांचं संख्याबळ आहे त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. मात्र आज हा दावा कपिल सिब्बल यांनी खोडून काढला आहे. आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला जातो आहे. ठाकरे गटाकडून ही मागणी करण्यात येते आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्याशिवाय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये. तर सुप्रीम कोर्टात कुणाचंही निलंबन झालेलं नाही त्यामुळे निर्णय द्यावा अशी मागणी जेठमलानी यांनी केली होती. आता निवडणूक आयोगात काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

धनुष्यबाणावर आज निर्णय नको

उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिंदे गट म्हणजे शिवसेना नाही. ती कपोलकल्पित फूट आहे असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात म्हटलं आहे. आमदारांनी स्वतः पक्ष सोडला आहे त्या घटनेचा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत आपण कुठलाही निर्णय घेऊ नये अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. तसंच एकनाथ शिंदे गटाने जी प्रतिज्ञापत्रं दाखल केली आहेत ती बोगस आहेत असाही दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे.

२१ जून २०२२ ला शिवसेनेत मोठी फूट

२१ जून २०२२ ला शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे हे सुरूवातीला १५ आमदारांना सोबत घेत नॉट रिचेबल झाले. त्यानंतर ही संख्या ४० पर्यंत गेली. या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. उद्ध ठाकरेंनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर ३० जूनल २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्मयंत्री झाले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी दावा सांगितला आहे. चिन्ह आणि पक्ष कुणाचा ही लढाई निवडणूक आयोगात सुरू आहे. तर निलंबन आणि इतर बाबी यांचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणं बाकी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena belongs to uddhav thackeray split has no meaning claimed kapil sibal in the election commission scj