शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पूर्ण कुटुंबासह अयोध्येत दाखल झाले आहेत. संपूर्ण ठाकरे कुटुंब पहिल्यांदाच अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन करताना दिसत आहे. दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर उतरले आहेत आणि त्यांचा अयोध्या दौरा सुरु झाला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी लक्ष्मण किला या ठिकाणी भेट दिली. सकाळी ११ वाजताच्या विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले होते.
अयोध्येतील क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज यांना आपले म्हणणे कळावे म्हणून उद्धव ठाकरे हिंदीतून भाषण देणार आहेत असेही समजते आहे. रविवारी दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे पत्रकारांशी तर एक वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.
शिवनेरी गडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत पोहचले आहेत. शिवनेरीवरच्या बाल शिवाजी आणि जिजामाता यांच्या पुतळ्याला अभिवादन करून उद्धव ठाकरेंनी तिथली माती सोबत घेतली आहे. संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे, विश्वनाथ महाडेश्वर हेदेखील अयोध्येत गेले आहेत.
अयोध्येतून शिवसैनिक असलेली एक ट्रेन आज रात्री १० वाजता निघेल आणि सकाळी नाशिकला पोहचेल असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तर उद्या (रविवार) दुपारी चार वाजता एक ट्रेन अयोध्येतून रवाना होईल असेही त्यांनी स्पष्ट केले
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरयू नदीची आरती केली. आज आणि उद्या असे दोन दिवस ते अयोध्या दौऱ्यावर असून राम मंदिराचा मुद्दा त्यांनी उचलून धरला आहे. काहीही झाले तरी राम मंदिर झालेच पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. लक्ष्मण किला या ठिकाणी भेट दिल्यावर ते शरयू नदीच्या काठी आले. तिथे त्यांनी शरयू नदीची आरती केली तसेच राम मंदिरासाठी प्रार्थनाही केली
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शरयू नदीच्या किनारी दाखल झाले आहेत. शरयू नदीचा काठ २१०० दिव्यांनी उजळणार आहे अशीही माहिती समोर आली आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे दाखल झाले असून त्यांनी शरयू नदीचं दर्शन घेतल्याचंही समजतं आहे, काही वेळातच ते शरयू नदीची पूजा करणार आहेत.
राम मंदिरासाठी सरकार कायदा आणण्याच्या तयारीत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.
अयोध्येत कोणत्याही परिस्थितीत राम मंदिर झालेच पाहिजे अशी आग्रही भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. एवढेच नाही तर राम मंदिर कधी उभारणार ती तारीख सांगा असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तारीख आज समजलीच पाहिजे. बाकीच्या गोष्टी नंतर होत राहतील असेही ते म्हटले आहेत.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच शिवनेरीहून आणलेल्या मातीची अयोध्येत पूजा केली. राम मंदिर बांधले पाहिजे त्यासाठी अध्यादेश काढला गेला पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्यासाठी ते दोन दिवसांच्या अयोध्याा दौऱ्यावर गेले आहेत. त्याआधी त्यांनी शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन केले. तिथली माती घेऊन ते अयोध्येला गेले आहेत. त्याच मातीची पूजा करण्यात आली.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक त्यांच्यासोबत आले आहेत. त्यांचा हा अयोध्या दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे
लक्ष्मण किला या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे स्वागत साधू संतांकडून करण्यात आले. त्यानंतर हे ठिकाण त्यांनी सोडले आहे असे समजते आहे.