केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी २ हजार कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत केली. याखेरीज आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात यावी. आंध्र प्रदेश व ओदिशातील चक्रीवादळ तर महाराष्ट्रातील दुष्काळावर लोकसभेत चर्चेस प्रारंभ झाला. विरोधी पक्षांनी केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे जणू काही शिर नसलेले धड असल्याची टीका बिजु जनता दलाच्या कमलेश सिंह देव यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे मुख्यमंत्री व्यथित
मुंबई:राज्यात आणि विशेषत मराठवाडय़ात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांमुळे आपण व्यथित झालो असून शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार निश्चितच मार्ग काढेल. केंद्र सरकारकडे साडेचार हजार कोटी रुपये मदतीसाठी प्रस्ताव पाठविला असून पंचनामे न करता प्रस्ताव पाठविण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
‘दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटी द्यावेत’
केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी २ हजार कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत केली.
First published on: 03-12-2014 at 12:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena demand two thousand crore for maharashtra drought