Shivsena Leader Sudhir Suri Attacked in Amritsar : पंजाबमधील अमृतसरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत सुधीर सुरी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर सुरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता मृत घोषित केलं.

अमृतसर येथील गोपाळ मंदिराच्या बाहेर कचऱ्यात देवांच्या मुर्ती सापडल्या होत्या. यावरून मंदिराच्या बाहेर सुधीर सुरी आंदोलनाला बसले होते. तेव्हाच गर्दीतून आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत सुधीर सुरी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर आनन-फानन रुग्णालयात सुधीर सुरी यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली आहे.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

सुधीर सुरी यांना तीन ते चार गोळ्या लागल्याची शक्यता वर्तवली जात होती. मागील काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात होता. त्याची कुणकूण लागताच पोलिसांनी काही लोकांना अटक सुद्धा केली होती.

पाहा व्हिडीओ –

पंजाब एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी २३ ऑक्टोबरला ४ जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेले आरोपी रिंडा आणि लिंडा टोळीसाठी काम करत होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी सुधीर सुरी यांच्या हल्ल्याचा कट रचल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. यासाठी सुधीर सुरी यांची रेकीही केले होती. दिवाळीपूर्वीच सुरी यांच्यावर हल्ला करायचा होता, असेही आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितलं होतं.