येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पुरस्कृत उमेदवार समर्थनासाठी देशभर दौरे करत आहेत. असे असताना येत्या ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुरस्कृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. या निर्णयानंतर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मार्गारेट आल्वा यांच्या नावावर सर्वांचे एकमत आहे. त्या अनुभवी नेत्या आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, असे संजय राऊत म्हणाले. तसे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

हेही वाचा >> Video : “वाजपेयीही मोदींविरोधातल्या कटात सामील होते का?” वाजपेयींचा जुना व्हिडीओ शेअर करत काँग्रेसचा खोचक सवाल; व्हिडीओ व्हायरल!

anjali damania dhananjay munde
Anjali Damania: उद्या मी पुरावे मांडल्यानंतर फडणवीस, अजित पवार मुंडेंची पाठराखण करूच शकणार नाहीत – अंजली दमानिया
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार

“आजच्या बैठकीला १७ पक्ष होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा झालेली आहे. सर्वांचे मार्गारेट अल्वा यांच्या नावावर एकमत आहे. त्या अनुभवी नेत्या आहेत. आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू” असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> Ukraine War: सनफ्लॉवर ऑइलच्या बदल्यात बीअर; तेलटंचाईवर मात करण्यासाठी जर्मनीमधल्या पब्जची शक्कल

आज दुपारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजपा विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एकूण १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आल्वा केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या, गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिला आहे. त्या राज्यसभा सदस्य होत्या. आम्ही काही नावांवर चर्चा केली आणि शेवटी एकमताने मार्गरेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे, अशी माहिती शरद पवार यांनी ही बैठक संपल्यानंतर दिली.

हेही वाचा >> मथुरा: कचरा गाडीत योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदींचे फोटो, सफाई कर्मचाऱ्यानं गमावली नोकरी

दरम्यान, देशाच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. तर १९ जुलै ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या १० ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे.

Story img Loader