येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पुरस्कृत उमेदवार समर्थनासाठी देशभर दौरे करत आहेत. असे असताना येत्या ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुरस्कृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. या निर्णयानंतर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मार्गारेट आल्वा यांच्या नावावर सर्वांचे एकमत आहे. त्या अनुभवी नेत्या आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, असे संजय राऊत म्हणाले. तसे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा