कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या चित्रदूर्ग मठाचे मठाधीश शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना अटक करण्यात आली असून कर्नाटक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्यावर अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – महिलेला मारहाण करणं राज ठाकरेंना तरी पटेल का? आरोपी मनसे पदाधिकारी म्हणाला…

शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्यावर दोन अल्पवयीन मुलींनी मैसूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर शिवामूर्तींविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मठाच्या माध्यमातून चालत असलेल्या शाळेतील दोन मुलींवर १ जानेवारी २०१९ ते ६ जून २०२२ यादरम्यान लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

हेही वाचा – “…तर ते मदरसे उद्ध्वस्त केले जातील”, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मांचा इशारा

त्यानंतर या पीडित मुलींनी मठातून पळ काढत कोट्टनपेट पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलीस अधिकाऱ्यांच्या सहाय्याने या मुलींनी या मठाधीशांविरोधात मैसूरच्या नाझारबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या शिवामूर्तींविरुद्ध लुकआऊट नोटीस जाहीर केली होती. अखेर पोलिसांनी शिवामूर्तींना अटक केली आहे. दरम्यान, हे आपल्या विरोधात रचलेलं कटकारस्थान आहे. याप्रकरणात लवकरच निर्दोषत्व सिद्ध करु, असे शिवामूर्ती यांनी म्हटलं आहे.