बॉडी शेमिंगला कंटाळून आणि मानसिक छळाला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. २७ वर्षे युवतीने १२ जुलैच्या दिवशी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर या तरुणीच्या कुटुंबाने आरोप केला आहे की तिला तिच्या बँकेतले सहकारी बॉडी शेमिंग करत होते आणि मानसिक छळ करत होते त्यामुळे तिने हे पाऊल उचललं.

शिवानी त्यागी असं मृत तरुणीचं नाव

ही तरुणी अॅक्सिस बँकेला थर्ड पार्टी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीत टेली कॉलर म्हणून काम करत होती. अॅक्सिस बँकेचे थर्ड पार्टी कर्चमाची नोएडा येथील अॅक्सिस बँक हाऊस बिल्डिंगमध्ये काम करतात. त्याच इमारतीत ही तरुणीही काम करत होती. शिवानी त्यागी असं या तरुणीचं नाव होतं. शिवानीच्या भावाने ही तक्रार केली आहे केली आहे तीन सहकाऱ्यांनी तिचं बॉडी शेमिंग करत होते, तसंच तिचा मानसिकदृष्ट्या छळ झाला त्यानंतर माझ्या बहिणीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी या प्रकरणी शिवानी त्यागीच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तिघांवरिोधात कलम १०८ द्वारे गुन्हा दाखल केला आहे. ज्या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यात एक महिलाही आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- “सॉरी बेटा, काळजी घे”; वडिलांचा मुलाला फोन आणि वरळी सी लिंकवरुन उडी मारत आत्महत्या

शिवानीच्या भावाने नेमकं काय म्हटलं आहे?

शिवानीच्या भावाने सांगितलं की आम्हाला शिवानीच्या खोलीत एक सुसाईड नोट मिळाली त्यात तिने माझा ऑफिसमध्ये मानसिक छळ होतो आहे असं म्हटलं होतं. तसंच मी बॉडी शेमिंग आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करते आहे असंही तिने म्हटलं होतं. माझ्या बहिणीने १२ जुलै रोजी एक विषारी पदार्थ खाल्ला आणि त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. ज्यानंतर घाईने तिला गाझियाबाद येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथल्या डॉक्टरांनी तिला तुम्ही जीटीबी रुग्णालयात न्या असं सांगितलं, तिथे उपचारांच्या दरम्यान शिवानीचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून पुढील तपास सुरु

या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस उपायुक्त रवि कुमार सिंह यांनी या प्रकरणी ही माहिती दिली की आम्ही शिवानीच्या ऑफिसमधलं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. तसंच आमची आमच्या पद्धतीने चौकशीही सुरु आहे. तिच्या बरोबर जे सहकारी काम करत होते त्यांचीही चौकशी आम्ही करत आहोत. या प्रकरणी तपास योग्य दिशेने सुरु आहे. या सगळ्यानंतर अॅक्सिस बँकेनेही स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवानी त्यागीने आत्महत्या केली, ज्यानंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

शिवानी त्यागीच्या मृत्यूनंतर अॅक्सिस बँकेने स्पष्टीकरण दिलं आहे की जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे. आम्ही या मुलीच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ती आमच्या बँकेची कर्मचारी नव्हती. क्वेस कॉर्प लिमिटेड या कंपनीसाठी ती काम करत होती. क्वेस कॉर्पच्या एका कर्मचाऱ्याशी तिचा वाद झाला होता असंही आम्हाला समजलं होतं. आम्ही त्यानंतर क्वेस कंपनीला चौकशी करायला सांगितली होती. १० जुलै रोजी त्या कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. क्वेस कॉर्प त्या कर्मचाऱ्यावर योग्य कारवाईही करत होतं. त्या दरम्यान ही घटना घडली जी दुर्दैवी आहे असं बँकेने म्हटलं आहे.