पीटीआय, नवी दिल्ली

भाजप मते मागण्यासाठी लोकांपर्यंत जात आहे, तथापि, ‘काही लोक’ मात्र मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी तांत्रिक विधी करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी केली. उजैन येथील एका स्मशान घाटात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांची प्रतिमा समोर ठेवून त्यांच्या विजयासाठी मांत्रिकांकरवी काही विधी केले जात असल्याची छायाचित्रे बुधवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्याअनुषंगाने चौहान यांनी काँग्रेसवर नामोल्लेख टाळून टीका केली.      

loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

चौहान म्हणाले, ‘‘आम्ही लोकांपर्यंत जाऊन केलेल्या कामांची माहिती देत आहोत, त्याच वेळी काही लोक मात्र स्मशानात तांत्रिक क्रिया करीत आहेत. ही लोकशाही आहे का? लोकशाहीत लोकांची पूजा केली जाते. लोकांचा विश्वास मिळवण्याचा आणि त्यांची सेवा करण्याचा हाच मार्ग आहे.’’ मध्य प्रदेशात विधानसभेसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होत असून भाजपच्या ‘हाय-टेक’ प्रचार रथाच्या उद्घाटनप्रसंगी चौहान बोलत होते. आम्ही काम केले आहे आणि त्याच्याच आधारावर लोकांकडे मते मागत आहोत. तुम्ही (काँग्रेस) मात्र स्मशानात मांत्रिक क्रिया करीत आहात. तुमच्या या कृतीचा देश, राज्य आणि लोकांना काही उपयोग होईल का? त्यापेक्षा तुम्ही भगवान महाकालची पूजा करा, मी त्याची पूजा केली आहे, असे चौहान म्हणाले.

हेही वाचा >>>इस्रायल-हमास युद्धावरून जो बायडेन यांना अमेरिकन खासदाराने सुनावलं, म्हणाल्या, “जागे व्हा आणि…”

आम्ही केलेल्या कामांची माहिती देऊन लोकांकडे मते मागत आहोत. काही लोक मात्र स्मशानात मांत्रिक क्रिया करीत आहेत. ही लोकशाही आहे का?- शिवराज चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

Story img Loader