मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील तसेच देशातील प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत दावा केला होता की लवकरच मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार येईल. शिवराज सिंह चौहान यांचं सरकार जाऊन तिथे कमलनाथ यांचं सरकार येईल. राहुल गांधींच्या या दाव्याला स्वतः मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तर दिलं आहे. ते एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते.
शिवराज सिंह चौहान म्हणाले, गालिबचे हे विचार मनोरंजनासाठी चांगले आहेत. मला समजत नाहीये राहुल कधी परिपक्व होणार? कधी ते शेतात पेरणी करताना दिसतात, तर कधी ट्रकने प्रवास करतात, अरे भावा आम्ही स्वतः शेती केली आहे. राहुल गांधी ट्रकने प्रवास करून ट्रकचालक आणि क्लीनर्सशी बोलतात. तर कधी शेतकऱ्याला घरी बोलावतात आणि त्याच्याशी बोलतात. मला समजत नाही त्यांना नेमकं काय करायचं आहे.
हे ही वाचा >> शरद पवारांची भेट चोरडियांच्याच घरी का घेतली? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण!
मुख्यमंत्री चौहान म्हणाले, राहुल गाधी कधी एखाद्या वैराग्यासारखे दिसतात, जसं की त्यांना आता कुठल्याच मोहमायेत पडायचं नाही. त्यांच्यात परिपक्वता कधी येणार? मला त्यांच्यात आजवर कधीच परिपक्वता दिसली नाही. त्यामुळेच ते अशा प्रकारची वक्तव्ये करतात. ते त्यांच्यासाठी सोपं आहे. त्यांनी आता खरंच परिपक्व व्हायला हवं. आता त्यांचं वयसुद्धा वाढलं आहे. माझ्या मते त्यांचं वय आता ५० च्या पुढे गेलं आहे बहुतेक. कमलनाथ मुख्यमंत्री होतील असं ते (राहुल गांधी) सहज बोलून जातात,