दिल्ली पोलिसांनी जहांगीपुरी भागातून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी हातबॉम्बदेखील जप्त केले आहेत. दरम्यान, त्यांच्या चौकशीअंती आणखी एक धक्कादायक माहिती उघड आली आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर काँग्रेस, शिवसेना आणि बजरंग दलांचे काही नेते असल्याचे पुढे आले आहे. तसेच या कामासाठी त्यांना मोठी रक्कम देण्यात येणार होती, अशीही माहिती आहे.

हेही वाचा – Viral News : विमानतळावर लगेजमधून हरवलेली सुटकेस Tiktok मुळे 4 वर्षांनंतर सापडली, महिला म्हणाली,” मी खूप…”

एपीबी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी भागातून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या निशाण्यावर काँग्रेसचे दोन नेते तसेच शिवसेना आणि बजारंगदलाचे काही नेते होते. दोघांना या नेत्यांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती. यासाठी त्यांनी नेत्यांच्या घराची रेकीही केली होती. यामध्ये पंजाबमधील शिवसेनेच्या काही नेत्यांचा समावेश होता. हे नेते कुठं फिरतात? कोणाबरोबर जातात? तसेच त्यांच्या सुरक्षेची माहितीही या दोघांनी घेतली होती. या कामासाठी त्यांना दीड कोटी रुपयांची रक्कम टप्प्याटप्यात देण्यात येणार होती.

हेही वाचा – पती-पत्नीच्या नात्याला काळीमा; पत्नीकडून बळजबरीने चालविले सेक्स रॅकेट, पतीला अटक

दरम्यान, या दोन्ही दहशतवाद्यांचे उल अन्सार आणि खलिस्तान टायगर फोर्स या संघटनांशी संबंध असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच या संघटनांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चे समर्थन असून भारतात दशतवादी हल्ला करण्याचा कट या संघटनातर्फे केल्या जात असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला आहे.

Story img Loader