अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. शरयूचा काठ झगमगाटून गेला आहे. रोषणाईनं अयोध्या जणू फुलून गेली आहे. सगळ्यांच्या नजरा या भूमिपूजनाच्या समारंभाकडे लागल्या आहेत. तर दुसरीकडे राम मंदिराचं निर्माण होत असल्यानं शतकांपासून सुरू गाजत आलेल्या अयोध्येतील या मुद्द्याच्या इतिहासातही डोकावलं जात आहे. अनेक घटना, संघर्ष या मुद्याभोवती गुंडाळलेला आहे. त्यातला एक टप्पा होता ६ डिसेंबर १९९२ चा.
६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली. सकाळी दहाच्या सुमारास लाखांच्या संख्येत येथे कारसेवक जमले होते. त्यानंतर देशात प्रचंड सांप्रदायिक दंगेही उसळलेले बघायला मिळाले होते. अयोध्येत झालेल्या या घटनेनंतर शिवसेनेनं नेहमीच्या शैलीत यावर भूमिका मांडली.
आणखी वाचा- अयोध्या-बाबरी वादामुळे कशी पेटली मुंबई?
स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी पाडली गेल्यानंतर जाहीर भाषणातून वक्तव्य केलं होतं. जे बरंच चर्चेतही राहिलं. साडेतीन हजार हिंदूंची देवळ पाडण्यात येऊन त्यांच्या मशिदी बांधण्यात उभ्या राहिल्या. साडेतीन हजार. आम्ही काय म्हणतो आम्हाला साडेतीन हजार मशिदी पाडायच्या नाहीत. आम्हाला आमच्या फक्त तीन मशिदी द्या. बाबरी जी पडली. दोन पाडायच्या आहेत आणि ती काशी आणि मथुरा. बाकी ठेवा तुमच्याकडे. घाला लोटांगण,” असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.
आणखी वाचा- बाबरी पतनाचा मागोवा ! नेमकं काय आणि कसं घडलं?
त्याचबरोबर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीतही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका मांडली होती. “बाबरी पाडली ही गौरवाचीच गोष्ट आहे. त्यात लाजण्यासारखं काही नाही. बाबरी मशीद पाडली गेली, कारण त्या खाली राम मंदिर होतं. इतिहास असं म्हणतो की, बाबरानं हिंदू देवळं पाडली. आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत, मशिदीच्या जागी देवळं उभी करू, यात मुस्लिमांनी सहभागी व्हायला,” असं बाळासाहेब म्हणाले होते.