दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमानाचा मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला, असं शिवसेनेनं शिवसेनेतील फूटनाट्याच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलताना म्हटलंय. शिवसेनेचे १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं जे फुटीर आमदार आहेत त्यांच्यापैकी अनेकांचे गोत्र हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच असल्याचा टोला लगावला आहे. तसेच, असं असलं तरी भाजपाने अनेक राज्यांमध्ये सत्तेसाठी तडोजीडी केल्या असून तसाच प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदही न देणारी भाजपा आणि शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देण्यासाठी पायघड्या घालत असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
नक्की पाहा >> Photos: “उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा