उत्तर प्रदेशात अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या घरावर टाकलेल्या छप्यातून कोट्यवधींची रोकड आणि अनेक किलो सोने जप्त करण्यात आले होते. त्यानंतर पियूष जैनच्या घरावरील छापेमारीवरून पंतप्रधान मोदींनी नाव न घेता समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला होता. कानपूर मेट्रो रेल्वेचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी याबाबत भाष्य केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१७ पूर्वी उत्तर प्रदेशात भ्रष्टाचाराचे जे अत्तर शिंपडले होते, ते आता सर्वांसमोर येत आहे. पण हे अत्तर शिंपडणारे तोंडाला कुलूप लावून गप्प बसले आहेत. त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत नाही. नोटांचा जो डोंग संपूर्ण देशाने पाहिला हे त्यांचेच काम आहे. हेच त्यांचे सत्य आहे. उत्तर प्रदेशची जनता सर्वकाही बघतेय आणि समजत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे.

“राजकारणात आजकाल सर्व प्रकारचे लोक अशाप्रकारचे महागडे अत्तर घरात ठेवतात. पण दुसऱ्यांच्या घरात सापडले की अशा प्रकारचे वक्तव्य केले जाते. लखनऊ, कनौज, कानपूरमध्ये १८० कोटींचे कागदाचे अत्तर मिळाले आहे आणि त्याच्यावर राजकारण सुरु आहे. गोवा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये याच अत्तराचा वापर करुन तुम्ही निवडणूक जिंकणार आहात. तुम्ही कितीही अत्तर लावले तरी राजकारणात हमाम मे सब नंगे है,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“आपल्या देशात अत्तराचेही राजकाराण होऊ शकते इतका देश सांस्कृतिक दृष्ट्या महान झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या एका व्यापाऱ्याकडे अत्तराच्या कमाईतून मिळालेले १८० कोटींचे घबाड सापडले. त्यामुळे देशात प्रत्येकाला वाटत आहे की आपण अत्तर विकायला हवं. आता ते अत्तर कोणाचे आणि इतके दिवस कोण अंगाला लावून राजकारण करत होतं त्याच्यावर वास सुटला आहे. राजकारणामध्ये प्रत्येकाला आता अत्तराची गरज आहे. कोणी कितीही टिका केली तरी प्रत्येक जण त्या अत्तराच्या सुगंधाशिवाय राजकारण करु शकत नाही. २०१४ साली महाराष्ट्रात अत्तराच्या बाटल्या कोण रिकाम्या करत होते? त्यामुळे सगळेच जण हे अत्तर लावून राजकारण करत असतात त्याबद्दल चर्चा न केलेली बरी,” असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, कानपूरमधील अत्तर व्यापाऱ्याच्या घरावरील छाप्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपूर्वी भरभरून नोटा आढळून आल्या. यानंतरही हे सर्व आम्हीच केलं आहे, असं हे लोक म्हणतील. पण कानपूरचे नागरिक, व्यापारी हे चांगल्याप्रकारे समजू शकतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.