गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हत्यासत्र सुरू आहे. श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिकेसह अन्य एका शिक्षकाची दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या पाच दिवसांत दहशतवाद्यांनी सात नागरिकांचा बळी घेतल्याने काश्मीरमधील दहशतीचे सावट गडद झाले आहे. याच मुद्द्यावरुन आता शिवसेनेनं केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या धोरणावर टीका केली आहे. ईडी, सीबीआय, आयटीसारख्या यंत्रणा वापरुन राजकीय विरोधकांना लक्ष्य केलं जातं असतानाच काश्मीरमध्ये मात्र केंद्राला यंत्रणा वापरुन दहशतवाद थांबवण्यात अपयश येत आहे असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे. इतकचं नाही तर भाजपाचे कार्यकर्ते अगदी क्रूझवरील पार्ट्यांपासून ते शेतकरी आंदोलनाविरोधामध्ये ‘खासगी आर्मी’ उभारण्यापर्यंत सगळीकडेच दिसून येत आहेत तर त्यांनीच छातीचा कोट करून कश्मीरातही जावे असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा