शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाने एकत्र येऊन राज्यात स्थापन केलेलं सरकार हे ‘उधारीचं सरकार’ असल्याची टीका करतानाच शिवसेनेनं शिंदे-फडणवीस महाराष्ट्राचे तीन तुकडे करतील असा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर केलेल्या भाषणावरुन शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. शिंदेंनी भाषणादरम्यान रात्रीच्या भेटीगाठींबद्दल केलेल्या उल्लेखावरुन शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘नाईट किंग’ असा केला आहे. तसेच शिंदे यांचं विधानसभेमध्ये भाषणादरम्यान भावूक होणं हे नाटक होतं, असा टोलाही शिवसेनेनं लागवलाय. भाजपाने सर्वच बंडखोर आमदारांना ‘शुद्ध’ करून घेतल्याने आता भाजपाचे नेते कोणाविरोधात बोलणार?, असा प्रश्नही शिवसेनेनं विचारला आहे. शिंदेंसोबत गेलेल्या गेलेल्या किमान २५ आमदारांनी शिवसेनेसाठी कोठे रक्त सांडले, कोठे लाठ्या खाल्ल्या, घरावर कधी तुळशीपत्र ठेवले?, असे प्रश्नही शिवसेनेनं विचारले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा