कर्नाटक सरकारने विधानसभेत सीमाप्रश्नासंदर्भातील वाद हा महाराष्ट्राने निर्माण केल्याचं म्हणत या वादाचा निषेध ठराव मांडला व मंजूर करून घेतल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर शिवसेनेनं आगपाखड केली आहे. बोम्मई यांना ‘मिटवायचे नसून पेटवायचे आहे’ असं म्हणत शिवसेनेनं घुसखोरीची भाषा करणाऱ्या कर्नाटकला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल असंही म्हटलं आहे.

या आगलावेपणाची खरेच गरज होती काय?

“गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करूनदेखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आपला हेका आणि ठेका सोडायला तयार नाहीत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अचानक चिघळला आणि उफाळला तो फक्त बोम्मई यांच्यामुळेच. सीमा प्रश्नाचे घोंगडे सर्वोच्च न्यायालयात भिजत पडले असताना बोम्मई यांनी एक इंच काय, अर्धा इंचही जमीन महाराष्ट्रास देणार नाही, असा फटाका फोडला. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या हद्दीतील सांगली, सोलापूर वगैरे भागांतील गावांवर हक्क सांगितला. या आगलावेपणाची खरेच गरज होती काय?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या…”, या वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव; म्हणाले, “मी गंमतीने…”
loksatta readers response
लोकमानस : भारतालाही फटका बसण्याची शक्यता
ajit pawar
उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?

दिल्लीतून कर्नाटकात पाऊल टाकताच बोम्मई यांनी…

“आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते (बोम्मई) महाराष्ट्राच्या नावाने कडाकडा बोटे मोडत राहिले व केंद्रीय गृहमंत्री शहांनी चर्चेस बोलावले तेव्हा, ‘‘ते ट्विटर अकाऊंट माझे नाहीच. त्यावर कोण काय लिहिते त्याच्याशी आपला संबंध नाही,’’ अशा प्रकारची भूमिका घेतली. हा एक विनोदच म्हणावा लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे लोक दिल्लीत सीमाप्रश्नी बैठकीसाठी गेले तेव्हा फक्त पंधरा मिनिटांत हारतुरे, स्वागत, फेटा बांधणे व चर्चा असे सोपस्कार आटोपून दोन्ही राज्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी असे ठरले, पण दिल्लीतून कर्नाटकात पाऊल टाकताच बोम्मई यांनी शब्द फिरवला व पुन्हा तोच मृदंग एकाच बाजूला वाजवायला सुरुवात केली,” असं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून बोम्मईंना लक्ष्य करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> “बिल क्लिंटनही विचारतात Who is Eknath Shinde? केवढं काम करतो! कधी झोपतो? कधी…”; CM शिंदेंचा पत्रकारांसमोर दावा

उगाच मृदुंगावर थापा मारून काय उपयोग?

“आता त्यांनी कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्राने निर्माण केलेल्या वादाचा निषेध ठराव मांडला व मंजूर करून घेतला. अशा निषेध ठरावाची गरज होती काय? बोम्मई या ठरावात म्हणतात, ‘‘कर्नाटकची भूमी, पाणी, भाषा आणि कन्नडिगांच्या फायद्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कर्नाटकचे नागरिक व सभागृहाचे सदस्य यांचे या विषयावर एकमत आहे. त्याला धक्का बसत असेल तर घटनादत्त आणि कायदेशीर मार्गाने रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत.’’ कर्नाटक हे त्यांचे भाषिक राज्य आहे म्हणून त्यांच्या भावना चुकीच्या नाहीत, पण अशाच तीव्र भावना भाषा, संस्कृती, शिक्षण, रोजगार व फायदा याबाबतीत बेळगावसह मराठी सीमा भागातील व महाराष्ट्रातील १२ कोटी नागरिकांच्यादेखील आहेत. त्यामुळे उगाच मृदुंगावर थापा मारून काय उपयोग?” असा सवाल या लेखात उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राच्या इतिहास कर्नाटकच्या तुलनेत अधिक ज्वलंत, प्रखर

“कानडी प्रदेश, कानडी जनता, कानडी भाषा, कानडी संस्कृती, कला याबाबत महाराष्ट्राला प्रेम व अभिमान कायम आहे. किंबहुना कानडी ही मराठीची भाषाभगिनीच आहे. मराठी-कानडी भाषिक जनतेत अत्यंत प्रेमाचा संवाद आहे. त्यात मिठाचा खडा टाकून वातावरण नासविण्याचे उद्योग नेमके कोण करीत आहे? कर्नाटकात बेळगावसह सीमा भाग अन्याय्य पद्धतीने घातला गेला आहे. यावर फायद्याने बोलण्यापेक्षा आधी कायद्याने व मग माणुसकीच्या नात्याने बोलले पाहिजे. कानडी भाषा व संस्कृतीचे रक्षण करण्याचा जितका अधिकार तुम्हाला आहे तितकाच आपली भाषा व संस्कृती जपण्याचा अधिकार सीमा भागातील मराठी भाषिकांनादेखील आहे व त्यांना तो अधिकार घटनेनेच दिला आहे, हे बोम्मई यांनी विसरू नये. कर्नाटकाला भूमी आहे असे ते म्हणतात, मग महाराष्ट्राला भूमी, भाषा, इतिहास नाही काय? उलट तो इतिहास अधिक ज्वलंत, प्रखर आहे,” अशी आठवण शिवसेनेनं बोम्मई यांना करुन दिली आहे.

बोम्मई एकतर्फी वागून दहशत निर्माण करीत आहेत

“राणी चेनम्माविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे, पण महाराष्ट्राने छत्रपती शिवराय, झाशीची राणी अशा वीरांना जन्म दिला आहे. पं. भीमसेन जोशी, गंगुबाई हनगल यांच्यावर दोन्ही राज्यांनी तितकेच प्रेम केले. किंबहुना महाराष्ट्राने जास्तच केले. शिवराम कारंथ, भैरवप्पा, गिरीश कर्नाड यांच्यासह अनेक कन्नड साहित्यिक, कलाकारांवर महाराष्ट्राने जीव ओवाळला आहे. हे नाते विसरून बोम्मई एकतर्फी वागून सीमा भागांतील मराठी बांधवांवर दहशत निर्माण करीत आहेत,” असं म्हणत शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांत ‘ठोक’ उत्तर देण्याची हिंमत नसल्याने…

“गृहमंत्री अमित शहांची मध्यस्थीदेखील आता त्यांनी झुगारून लावली व पुन्हा कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्राचा निषेध करणारा ठराव मंजूर करून घेतला. याचा अर्थ त्यांना मिटवायचे नसून पेटवायचे आहे. महाराष्ट्रातील नेत्यांवर त्यांनी आरोप केले. संजय राऊत हे चीनचे एजंट व देशद्रोही आहेत, जयंत पाटील यांना संस्कृती नाही, असे बोलून ते काय साध्य करू इच्छितात? चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादेत खास पाहुणे म्हणून बोलावून त्यांना ढोकळा-गाठिया खाऊ घालणारे, झोपाळय़ांवर झुलविणारे कोण होते? आपले पंतप्रधान मोदीच होते ना? मग त्यांना बोम्मई कोणती उपाधी देतील? चीनला भारतात घुसण्याची संधी देणारे तुमचेच लोक आहेत. त्यामुळे चिनी एजंट कोण हे एकदा ठरवा. लडाख व अरुणाचलमध्ये चीन घुसला. चीन जगभरात ज्या पद्धतीने सर्वत्र घुसखोरी करीत आहे त्याच पद्धतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई बेळगाव गिळू पाहत आहेत. सांगली, सोलापुरात घुसण्याची भाषा करीत आहेत. त्यांच्या घुसखोरीस त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, पण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांत ‘ठोक’ उत्तर देण्याची हिंमत नसल्याने जनतेला ‘मऱ्हाठी’ बाणा दाखवावा लागत आहे. मऱ्हाठा एक तर उठत नाही व उठला तर बसत नाही, हे बोम्मई यांनी समजून वागले पाहिजे,” असा इशाराच शिवसेनेनं दिला आहे.

…तर निर्लज्जपणाची हद्दच झाली

“कर्नाटकची एक इंचही जमीन देणार नाही असे बोम्मई यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रालाही कर्नाटकची इंचभरही जमीन नकोच आहे. महाराष्ट्राला त्यांच्या हक्काचा बेळगावसह सीमा भाग हवा आहे व त्यासाठी लोकशाही तसेच कायदेशीर मार्गाने लढा सुरू आहे. महाराष्ट्राने संयम राखला आहे व तीच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत थातूरमातूर विषयांवर खोके सरकार नंगानाच करीत आहे आणि तिकडे कर्नाटक सरकारने महाराष्ट्राविरोधात निषेधाचाच ठराव मंजूर करून चपराक लावली आहे. हे समजत नसेल तर निर्लज्जपणाची हद्दच झाली! बोम्मई यांनी एक सांगावे, त्यांना हा वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे? त्यावर महाराष्ट्र आपली भूमिका ठरवेल,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Story img Loader