ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी जळगावमध्ये झालेल्या सभेत “शिवसेना कुणाची हे पाकिस्तानही सांगेल”, असं विधान केल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी ठाकरे गटाकडून थेट पाकिस्तान आणि भारताची तुलना करत सत्ताधारी भाजपावर टीकास्र सोडण्यात आलं आहे. सामनातील अग्रलेखातून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या एका विधानाचा संदर्भ घेत त्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. त्याचवेळी त्यांचं उदाहरण देऊन भारतातील सत्ताधाऱ्यांवरही आगपाखड केली आहे.

काय म्हणाले शाहबाज शरीफ?

शाहबाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर टीका करणारं एक विधान केलं होतं. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात भारताकडून हल्ला होऊ शकतो, अशी भीती दाखवत तिथल्या निवडणुका पुढे ढकलण्याची तयारी शरीफ यांनी सुरू केली आहे. त्यावरून भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना ठाकरे गटाकडून यावर परखड भूमिका घेण्यात आली आहे. मात्र, असं करतानाच शरीफ यांच्या या पद्धतीशी भारतातील सत्ताधारी भाजपाच्या धोरणाचीही तुलना करण्यात आली आहे.

Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
devendra fadnavis remark on vote jihad in mumbai
‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”

“निवडणुकीसाठी आपले जवान मारले असतील, तर…”, पुलवामा हल्ल्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

“पाकिस्तानात भलतेच घडताना दिसत आहे”

“धार्मिक वाद, जातीय दंगली, सीमेवरील दहशतवादी हल्ले आणि त्या वातावरणावर भाजल्या जाणाऱ्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या असे एक समीकरणच मागील काही वर्षांत आपल्या देशात बनले आहे. किंबहुना निवडणुकांसाठी असे अस्थिर आणि तणावाचे वातावरण आपल्या देशात जाणीवपूर्वक तयार केले जाते. त्या वातावरणात निवडणूक घेऊन राजकीय गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आपल्या शेजारच्या पाकिस्तानसारख्या देशात भलतेच घडताना दिसत आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“पुलवामाबाबत मोदी सरकारचा निष्काळजीपणा…”

“आपल्याकडे तरी मागील सात-आठ वर्षांत दुसरे काय घडत आहे? निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या धार्मिक दंगली, लष्करावर होणारे दहशतवादी हल्ले, त्यातील जवानांचे हौतात्म्य, त्यानंतर ‘सर्जिकल स्ट्राइक’चा देखावा, त्यातून भडकविण्यात येणारा तथाकथित राष्ट्रवादाचा उन्माद आणि त्यावर स्वार होत सत्ता मिळविण्याची धडपड हेच चित्र आपल्याकडेही दिसत आहे. मागील निवडणुकीपूर्वी झालेला पुलवामा हल्ला आणि त्यातील मोदी सरकारचा निष्काळजीपणा या चित्रात रंग भरणाराच आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटाकडून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

“अनाथांच्या नाथा, झाल्या असतील…”, कवितेतून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, शेतकऱ्यांची व्यथा मांडत म्हणाले…

“निवडणूक आणि युद्धाची भाषा हा हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील नेहमीचाच विषय आहे. दहशतवादी हल्ला किंवा युद्धाच्या भाषेचा राजकीय लाभ घेण्याची दोन्हीकडील राजकर्त्यांची मानसिकता सारखीच आहे. फक्त हिंदुस्थानात निवडणुकांच्या तोंडावर युद्धाचा बागुलबुवा उभा केला जातो तर पाकिस्तानात निवडणूक टाळण्यासाठी तो उभा केला गेला आहे”, अशा शब्गांत दोन्हीकडच्या सत्ताधाऱ्यांची तुलना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.