Shoaib Malik Sania Mirza Divorce : पाकिस्तानचा माजी क्रिकटेपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हे २०२२ पासून त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणींमुळे चर्चेत होते. यादरम्यान शोएब मलिक याच्या निकाहचे फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. दरम्यान आता शोएब मलिक याच्या बहिणींने या सानिया- शोयब यांच्या विभक्त होण्याबद्दल तसेच शोएबच्या लग्नाबद्दल काही आश्चर्यकारक खुलासे केले आहे.
शोएबच्या बहिणींनी या जोडप्याने घटस्फोट घेण्यामागे नेमकं काय कारण असू शकत याबद्दल सूचक माहिती दिली आहे. पाकिस्तान डेलीने दिलेल्या रिपोर्टनुसार, त्यांनी या दोघांच्या विभक्त होण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबरोबरच कुटुंबिय त्याच्या (शोएब) निकाहला उपस्थित नव्हते असेही स्पष्ट केले आहे. याबरोबरच सानिया मिर्झा ही शोएबच्या कथित विवाहबाह्य संबंधांवर नाखूष होती असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
सानिया आणि तिच्या कुटुंबियांनी बराच काळ तिच्या घटस्फोटाबद्दल मौन बाळगले होते. मात्र शोएब मलिकने सना जावेदशी निकाह केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच याबद्दल भाष्य केले होते. २१ जानेवारी २०२४ रोजी सानियाची बहीण अनम मिर्झा हिने इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने सानिया काही महिन्यांपूर्वीच शोएबपासून विभक्त झाली होती असे सांगितले होते.
यापूर्वी सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआयला माहिती दिली होती की, सानियाने शोएब मलिककडून खुला घेतला आहे. इस्लाममध्ये खुला हा पत्नीने घेतलेल्या घटस्फोटाचा एक प्रकार आहे, ज्याच्या माध्यमातून पत्नीला विभक्त होण्याचा अधिकार मळतो. पतीने दिलेल्या तलाकच्या उलट खुला या प्रकारातील घटस्फोटात पती आणि पत्नी या दोघांना समान अधिकार असतात.
शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या नात्यासंबंधी अनेक दिवांपासून चर्चा सुरू होत्या. मात्र शोएब मलिक याने सनाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर या चर्चांना जास्तचउधाण आले. २० जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या शुभेच्छांमध्ये शोएबने तिचा उल्लेख ‘Buddy’ असा केला होता. त्यानंतर शोएबने निकाहचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिली. सानिया आणि शोएब हे विभक्त झाल्यानंतर दोघे मिळून त्यांच्या मुलाचा सांभाळ करत आहेत.