कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्यात लढत होणार आहे. अशातच प्रसिद्ध कन्नड अभिनेते किच्चा सुदीप यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या समर्थनार्थ प्रचार करू, असे किच्चा सुदीप यांनी सांगितले.

किच्चा सुदीप यांच्या निर्णयानंतर अभिनेते प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. किच्चा सुदीप यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचं प्रकाश राज यांनी ‘एएनआय’शी बोलताना म्हटलं. “किच्चा सुदीप यांनी बोम्मईंनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर मला धक्का बसला. या निर्णयाने मी नाराज आहे,” असं प्रकाश राज म्हणाले.

हेही वाचा : “काँग्रेसपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले”; राहुल गांधींवर टीका करताना गुलाम नबी आझाद म्हणाले, “काँग्रेस पुन्हा सत्तेत…”

कर्नाटकात प्रचंड संख्येत चाहते असलेले सुदीप हे कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. “आपण राजकारणात प्रवेश करत नसून, निवडणूकही लढणार नाही. तसेच, आपण कुठल्याही पक्षाला पाठिंबा देत नाही,” असं किच्चा सुदीप यांनी स्पष्ट केले.

“मुख्यमंत्र्यांबद्दल आपल्याला जिव्हाळा आणि आदर आहे. कठीण काळात बोम्मई आपल्याबरोबर होते. त्यांच्या कुटुंबीयांशी आपला जवळचा संबंध आहे,” असेही किच्चा सुदीप म्हणाले.

हेही वाचा : काँग्रेस विचारसरणी न उरलेला देशद्रोही; राहुल गांधींविरोधात ज्योतिरादित्य शिंदेही रिंगणात

तर, किच्चा सुदीप यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बोम्मईंनी भाष्य केलं आहे. “सुदीप आपल्याला पाठिंबा देणार याचाच अर्थ तो, भाजपाचा प्रचार करेल,” असे बसवराज बोम्मईंनी म्हटलं.

Story img Loader