झारखंडमधील उलिहाटून निचितपूरला प्रवास करून करो नदीजवळील एका लग्न समारंभातून घरी परतणाऱ्या पाच मुलींवर १८ अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील १८ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली असून १६ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित पाचही मुली करो नदीजवळील एका लग्न समारंभात गेल्या होत्या. तिथून त्या घरी परतत असताना १८ अल्पवयीन मुलांनी त्यांना अडवलं अन् त्यांच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेबाबतची वाच्यता कुठेच न करण्याची धमकी या मुलींना देण्यात आली. या मुलांच्या तावडीतून सुटून पीडित मुली घरी पोहोचल्या आणि त्यांच्यावर ओढावलेली आपबिती त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितली. कुटुंबियांनी त्यांच्या गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांकडे धाव घेतली. पाचपैकी तिघींच्या जबाबाच्या आधारावर गुन्हा नोंदवण्यात आला. तसंच, या मुलांना अटकही करण्यात आली.

अल्पवयीन मुलांवर चालवणार प्रौढ खटला

“१८ मुलांना अटक करण्यात आली आहे. सर्व मुले अल्पवयीन आहेत तर सर्व बलात्कार पीडित मुली आहेत. या प्रकरणात त्यांना सर्व सरकारी सुविधा पुरवल्या जात आहेत”, असे वृत्तसंस्थेने झारखंडचे डीजीपी अनुराग गुप्ता यांच्या हवाल्याने म्हटले आहे. डीजीपी म्हणाले की, १६ वर्षांवरील मुलांवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाईल जेणेकरून आपल्या समाजात मुले अशी घाणेरडी कृत्ये करणार नाहीत.”

यापूर्वी, पोलिस अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला पुष्टी दिली होती की १२-१७ वयोगटातील आरोपी अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सोमवारी, ज्या मुलींवर सामूहिक बलात्कार झाला होता त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. अधिक तपास पोलीस करत असून आता १६ वर्षांवरील मुलांवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाणार आहे. जेणेकरून असं कृत्य करणाऱ्या इतरांवर चाप बसेल.