Shocking News Gujarat : एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर जवळपास ७ मुलांनी गेले दीड वर्षे शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्कार करणारेही महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्यांनी तरुणीचा खासगी व्हिडिओ काढला होता. हा व्हिडिओ दाखवून ते तिच्यावर बलात्कार करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
महाविद्यालयीन तरुणाची सोशल मिडियाच्या माध्यमातून या पीडित तरुणीशी मैत्री झाली होती. या तरुणाने तिचा कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ काढला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बलात्कार केला, असं एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलं आहे. ब्लॅकमेल करून आरोपी मित्राने नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्याशी आणि त्याच्या मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते, असंही यात म्हटलं आहे.
व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल
बनासकांठा एसपी अक्षयराज मकवाना म्हणाले की, “पहिल्या आरोपीने हा व्हिडिओ त्याच्या मित्राला पाठवला होता, ज्याने नंतर तो इतरांसोबत शेअर केला.” तथापि, हा व्हिडिओ एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आला आणि लवकरच व्हायरल झाला. महिलेच्या कुटुंबातील एका सदस्यापर्यंतही हा व्हिडिओ पोहोचला.
पीडिता आणि आरोपी एकाच समाजातील
आरोपी आणि पीडित महिला एकाच समाजाचे आहेत. म्हणून, सामुदायिक पंचायत आयोजित करण्यात आली होती, परंतु कोणताही निकाल न लागल्याने, महिलेच्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. एसपी मकवाना म्हणाले, “११ मार्च रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आणि आरोपीवर बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही सर्व आरोपींना पकडण्यासाठी आणि अटक करण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत.”