Shocking Rape Case Chhattisgarh : काका-पुतणीच्या नात्याला कलंक लागेल अशी घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या २४ वर्षीय काकांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका धार्मिक विधीनंतर ५ एप्रिल रोजी ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कन्याभोजनात सहभागी होण्यासाठी ही मुलगी तिच्या आजीच्या घरी गेली होती. पण ती तिथून घरी परतली नाही. दुर्गचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुखनंदन राठोड यांनी पत्रकारांना सांगितले की, ती बराचवेळ घरी आली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. खूप शोध घेतल्यानंतरही ती सापडली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीची आजी आणि आणखी एक नातेवाईक मंदिरात गेले होते. तिचा काका सोमेश यादव घरात एकटाच होता. दरम्यान, सोमेश यादवने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह शेजाऱ्याच्या गाठीत ठेवला, अशी माहिती माहिती पोलिसांनी दिली.

संशयित तिघांची चौकशी

ती कार रोज तिथे उभी असायची. त्या कारचा दरवाजा उघडा असल्याचंही त्याला माहीत होतं, असंही पोलिसांनी सांगितलं. या घटनेसंदर्भात पोलिसांनी चौकशीसाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी एकाने गुन्हा कबूल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. इतरांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.

“पोलिसांना रात्रीच्या वेळी शेजारी असलेल्या गाडीत मृतदेह आढळला. मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या आणि वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे”, असं राठोड म्हणाले.