कर्नाटकातील बंगळुरु येथील एका दुर्गम गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. बालविवाहाला कायदेशीर मान्यता नसतानाही आजही ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने बालविवाह केले जातात अन् त्यासाठी मुलीचे पालकच आग्रही असतात हे सातत्याने सिद्ध झालं आहे. आताही एका दुर्गम गावात एका १४ वर्षीय मुलीचं २९ वर्षीय तरुणाशी लग्न लावण्यात आलं. तिने या लग्नाला नकार दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३ मार्च रोजी १४ वर्षीय मुलीचं शेजारच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या कालिकुट्टई येथील २९ वर्षीय कामगार मधेशशी लग्न झालं. पण या मुलीचा या लग्नाला विरोध होता. ही मुलगी इयत्ता सातवीपर्यंत शिकली असून ती तिच्या आईवडिलांबरोबर राहत होती. ३ मार्च रोजी तिचं लग्न झाल्यानंतर ती काही दिवसांनी आपल्या माहेरी परतली अन् तिला हे लग्न मान्य नसल्याचं तिने म्हटलं. तिने सासरी जाण्यास नकार दिल्यानंतर तिचे आई वडील संपातले. तिची २९ वर्षीय आईनेच या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. दरम्यान, मुलगी पुन्हा माहेरी परतल्याने तिचा नवरा मधेश, त्याचा भाऊ मल्लेश (३८) या मुलीला घ्यायला तिच्या माहेरी आले. त्यांनी तिला घरी येण्याची विनंती केली. मात्र ती तयार होईना.

नातेवाईकाच्या घरातून नवऱ्याने खेचून नेलं

तिने पुन्हा आपल्या सासरी जावं याकरता तिच्या आई-वडिलांनी तिच्यापुढे तगादा लावला. एवढंच नव्हे तर ती एका नातेवाईकाच्या घरी लपलेली असताना तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर ओढले अन् खेचत त्याच्या घरी घेऊन गेला. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

दरम्यान, ढेंकणीकोट येथील ऑल वुमन पोलिस पथकाने घटनेचा तपास सुरू केला. तर, मुलीच्या आजीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मधेश, मल्लेश आणि आई नागम्मा यांना अटक केली आहे.