Reddit Post of Frustrated woman : तुम्ही मुलाखतीसाठी गेला आहात, पण जरा उशीर झाला तर काय हतं? तुमच्या वक्तशीरपणावरून तुम्हाला नोकरी नाकारली जाते. हेच जर उलटदर्शनी झालं तर? म्हणजे मुलाखत घेणाराच उशिरा आला अन् नोकरीच्या शोधात आलेल्या कर्मचाऱ्याने बॉसच्या वक्तशीरपणावरून नोकरी नाकारली तर? तुम्हाला आश्चर्य वाटेल ना… पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. रेडिटवर एका महिलेने यासंदर्भात सविस्तर पोस्टच लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेडिटवरील पोस्टनुसार एका निकोल नावाच्या महिलेने नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार ती मुलाखतीलाही गेली होती. पण मुलाखतकाराला येण्यास ४५ मिनिटे उशीर झाला. याबाबत तिने संतापही व्यक्त केला. अखेर तिने या नोकरीवर पाणी सोडलं आणि बॉसमध्ये हे गुणधर्म नसतात, असंही ती म्हणाली.

रेडिट पोस्टमध्ये महिलेने काय म्हटलंय?

याबाबत ती पोस्टमध्ये म्हणते, “नमस्कार, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी खूप विचार केला. जरी मी तुमच्या ऑफरची प्रशंसा करत असले तरी मी ही नोकरी स्वीकारू शकत नाही. हे सांगताना मला त्रास होतो, पण कालची आपली भेट माझ्या अपेक्षेनुसार झाली नाही. तुम्ही वेळेवर याल आणि आपण दोघांनी ठरवलेल्या वेळी भेटू अशी मला अपेक्षा होती. तुम्ही उशिरा आलात एवढेच नाही तर मी हे निदर्शनास आणून दिल्यावर तुम्ही बचावात्मक भूमिका घेतली आणि सबबीही सांगू लागलात. हे गुण मी बॉसमध्ये शोधत नाही. जर आपल्या भूमिका बदलल्या असत्या तर तुमचे वर्तन योग्य मानले गेले नसते यावर आपण दोघेही सहमत होऊ शकतो.

या पोस्टवर रेडिटवरील वापरकर्त्यांना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यापैकी एकाने शेअर केले की त्यांनाही अशाच काही गोष्टींचा सामना करावा लागला पण नियोक्ता त्यांच्यासाठी सर्वोत्तम बॉस ठरला. “माझ्या मुलाखतकाराने मला सुमारे २५ मिनिटे वाट पाहण्यास सांगितले कारण ती उशिरा येणार होती. अतिरिक्त वाट पाहिल्याने मी तिथे बसलो आणि अधिक घाबरलो पण त्याशिवाय सर्व काही ठीक होते. हे दिसून आले की ही व्यवस्थापक खूप मोठी आसामी आहे आणि ती नेहमीच व्यस्त असते. सर्वोत्तम बॉस आणि मी आतापर्यंत केलेले सर्वोत्तम काम मला मिळाले आहे”, एका वापरकर्त्याने म्हटले. दरम्यान, या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्यानंतर ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे.