कावेरी नदी पाणी वाटपाच्या प्रश्नामुळे आधीच चेन्नई आणि कोलकातमधील सामन्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र त्यातही चौघांनी मैदानात प्रवेश करत या मुद्यावर घोषणाबाजी केली. इतकंच नाही, तर चेन्नईच्या खेळाडूंवर बूटदेखील भिरकावण्यात आले. पोलिसांनी घोषणाबाजी करणा-यांना ताब्यात घेतलं आहे. हा सामना खेळवला जाऊ नये यासाठी धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. मात्र हा सामना रद्द न करता सुरक्षा वाढवण्यात आली होती.
राज्य सरकारने सुरक्षेसाठी चिंदंबरम स्टेडिअमला तब्बल चार हजार पोलीस तैनात केले होते. सामना सुरु झाल्यानंतर चेन्नईचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना आंदोलनकर्त्यांनी मैदानात बूट भिरकावला. यावेळी बाऊंड्री लाइनवर जाडेजा उभा होता. बूट फेकण्यात आल्याने काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता. खेळाडूंनीही खेळ पुन्हा सुरु होईपर्यंत मैदान सोडलं नाही.
काय आहे वाद ?
सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी केली असून तामिळनाडूच्या वाट्यातील पाणी कमी केलं असून, कर्नाटकचा वाटा वाढवला आहे. याशिवाय कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ गठीत झालेलं नाही. या मुद्द्यांवरुन तामिनाडूनत आंदोलन सुरु आहे. काहीजणांनी या प्रश्नावरुन आयपीएल सामन्यांच्या आयोजनाविरोधात आंदोलन करण्याची धमकी दिली होती.
#CauveryRow #IPL2018 #CSKvsKKR | Panic gripped fans at Chepauk Stadium as four men hurled shoes at the players. @chennaipolice_ caught hold of the men. pic.twitter.com/0t8ylUSIdm
— Bangalore Mirror (@BangaloreMirror) April 10, 2018
कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यात वाद सुरु आहे. अशात या वादाला नवे वळण लागले आहे. हे वळण या पाण्याच्या गुणवत्तेवर गेले आहे. कारण तामिळनाडूत पोहचणारे कावेरी नदीचे पाणी कर्नाटककडून दुषित केले जाते आहे असे केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आपल्या अहवालात म्हटले आहे. शुक्रवारी केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आपला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला. या अहवालात कर्नाटकातून तामिळनाडूला जाणारे कावेरी नदीचे पाणी प्रदुषित केले जाते आहे असे नमूद करण्यात आले आहे.
चेन्नईने केला कोलकाताचा पराभव
चेन्नईत खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या पाचव्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सचा पाच गडी राखत पराभव केला. आयपीएलच्या या हंगामातील चेन्नई सुपरकिंग्जला हा सलग दुसरा विजय ठरला. अटीतटीच्या या सामन्यात प्रत्येक क्षणाला सामन्याचं रुप बदलत होतं. अखेर चेन्नईने हा सामना जिंकला. या विजयाचा खरा हिरो ठरला तो सॅम बिलिंग्स. बिलिंग्सने २३ चेंडूत ५६ धावांची तुफानी खेळी केली. आपल्या या दमदार खेळीत त्याने दोन चौकार आणि पाच षटकार लगावले. आपल्या या मॅच विनिंग खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आला.