Donald Trump shot at during rally : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे एका प्रचार कार्यक्रमात बोलत असताना एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. “माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला मला गोळी चाटून गेली”, ट्रम्प यांनी काही वेळातच सोशल मीडियावर ही माहिती दिली. “खूप रक्तस्त्राव झाला आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेनसिल्व्हेनियामध्ये प्रचार रॅलीला संबोधित करत होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. रॅलीमध्ये अनेक शॉट्स वाजल्याने डोनाल्ड ट्रम्प लागलीच व्यासपीठाच्या मागे लपले.

s jaishankar on donald trump us president
“आम्हाला अमेरिकेची चिंता नाही”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका; म्हणाले, “ट्रम्प यांनी उचललेल्या पहिल्या तीन कॉलमध्ये…”!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
Donald Trumps legal cases
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?
Trump election impact on Tesla stocks
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय होताच एलॉन मस्क मालामाल; एका दिवसांत केली २६ अब्ज डॉलर्सची कमाई
Ramdas Athawale On US Election Results 2024 :
Ramdas Athawale : ‘डोनाल्ड ट्रम्प आणि मी ‘रिपब्लिकन’ पक्षाचेच’, रामदास आठवलेंची मिश्किल टिप्पणी!
kangana ranaut congratulations donald trump
कंगनाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उधळली स्तुतीसुमनं; म्हणाली, “मी अमेरिकन असते तर…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

हेही वाचा >> Donald Trump बोलले रेटून खोटे, बायडेन सत्यकथनातही अडखळले… पहिल्या निवडणूक ‘डिबेट’मध्ये कोणाची बाजी?

गोळीबाराचा आवाज येताच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कानाला चाटून गोळी गेली. त्यामुळे ते पटकन खाली कोसळले. जमावामध्ये निर्माण झालेल्या दहशतीदरम्यान, गुप्तहेर खात्याने लगेच डोनाल्डर ट्रम्प यांना सुरक्षित केले. त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्ताचे डाग दिसत होते. ते उभे राहून हात उंचावताच गर्दीतून आवाज आला. त्यानंतर काही वेळातच ते तेथून निघून गेले. सीक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्पच्या कार्यालयाने ते सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, प्रचारसभेत गोळीबाराचा चारवेळा आवाज आल्याचं एका समर्थकाने सांगितलं. त्यामुळे गोळीबाराचा आवाज येताच सगळेजण खाली वाकले. “मी सुमारे चार शॉट्स ऐकले आणि मी बघितले की जमाव खाली वाकला आणि नंतर ट्रम्प देखील लगेच खाली वाकले. मग सीक्रेट सर्व्हिसने शक्य तितक्या लवकर त्यांचे संरक्षण केले. एका सेकंदात हे सर्व घडलं”, असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. एक व्यक्ती पळून जात असताना लष्करी गणवेशातील अधिकारी त्याचा पाठलाग करत होता. त्यावेळीही गोळ्यांचा आवाजा ऐकू आला. परंतु त्यांना कोणी गोळ्या घातल्या हे अस्पष्ट आहे, असेही प्रत्यक्षदर्शी म्हणाला.

शूटरची ओळख आणि हेतू अद्याप अस्पष्ट आहे. सीक्रेट सर्व्हिसच्या निवेदनानुसार, शूटर मारला गेला. तर, दोन प्रेक्षक जखमी झाले आहेत. या घटनेचा हत्येचा प्रयत्न म्हणून तपास केला जात आहे, अशी माहिती वृत्तसंस्था एपीने दिली आहे. सीक्रेट सर्व्हिसने सांगितले की हल्लेखोर बाहेरून आलेले दिसत होते.

गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले

ट्रम्प (Donald Trump) यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “गोळीबारावर जलद प्रतिसाद दिल्याबद्दल युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस आणि कायदा अंमलबजावणी यांचे आभार मानले. आपल्या देशात असे कृत्य घडणे हे अविश्वसनीय आहे. शूटर, जो आता मरण पावला आहे, याबद्दल सध्या काहीही माहिती नाही.

गोळीबाराच्या घटनेचे वर्णन करताना ट्रम्प म्हणाले की, गोळी त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला लागली. मला लगेच कळले की काहीतरी गडबड आहे.मी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि माझ्या त्वचेतून काहीतरी बाहेर पडल्यासारखं वाटलं. खूप रक्तस्त्राव झाला, मग मला कळले की काय होत आहे. देव अमेरिकेला आशीर्वाद दे!”, असं ते म्हणाले.