Kamala Harris : अमेरिकन नागरिक आपल्या पुढील राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करतील. खरं तर या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. सध्या अमेरिकीत प्रशासकीय अधिकारी हे निवडणूक कर्मचाऱ्यांची सुरक्षा, मतदानासंदर्भातील प्रक्रियेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करत आहेत. अशातच अमेरिकेत राजकीय हिंसाचार वाढत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. यानंतर आता अमेरिकेतील ॲरिझोना येथे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती काही माध्यमांच्या वृत्तामधून समोर आली आहे. मात्र, ज्यावेळी कार्यालयात गोळीबार झाला, त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हतं. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यानंतर आता कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेनंतर तपास यंत्रणा घटनास्थळी जाऊन घटनेचा तपास करत आहेत. तसेच त्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पावले उचलली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
s jaishankar on donald trump us president
“आम्हाला अमेरिकेची चिंता नाही”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका; म्हणाले, “ट्रम्प यांनी उचललेल्या पहिल्या तीन कॉलमध्ये…”!
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
electing Donald Trump as the President of the United States for the second time
दुसरे ट्रम्पपर्व आणि भारत
Donald Trumps legal cases
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
Trump election impact on Tesla stocks
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय होताच एलॉन मस्क मालामाल; एका दिवसांत केली २६ अब्ज डॉलर्सची कमाई

हेही वाचा : HDFC Bank Employee Death : HDFC बँकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू, सहकाऱ्यांचा आरोप

गोळीबार घडल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. कार्यालयाच्या खिडक्यांमधून गोळ्या झाडल्या गेल्या. दरम्यान, या कार्यालयात अशी घटना दुसऱ्यांदा घडली असल्याचंही सांगितलं जात आहे. पोलिसांनी सांगितले की, समोरच्या खिडक्यांवर पेलेट गनने गोळीबार करण्यात आला. या घटनांनंतर अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु केला आहे.

ट्रम्प यांच्यावरही हल्ला झाला होता

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोन वेळा हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर एका व्यक्तीला तातडीने अटक करण्यात आली होती. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये एका रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये ते थोडक्यात बचावले होते.