अमेरिकेच्या मेम्फिस शहरामध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार एका १९ वर्षीय अल्पवयीन मुलाने केल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे या मुलाने घटनेचा फेसबुक व्हिडीओ देखील बनवला आहे. ईझीकेल केल्ली असे या संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
गोळाबाराच्या घटनेनंतर संशयित अल्पवयीन आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. यासाठी स्थानिक नागरिकांची मदत देखील पोलिसांनी घेतली. या शोधमोहिमेदरम्यान आरोपी फेसबुकवर व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आरोपीचे छायाचित्र आणि माहिती प्रसिद्ध करत नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते.
विश्लेषण: इंग्लंडमध्ये बंदूक गुन्ह्यांचे चिंताजनक वाढते प्रमाण!
या घटनेदरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीतून पोलिसांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. आरोपीने हे कृत्य का केले याचे कारण अद्याप कळू शकले नाही.