मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कुणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत, अशी टिप्पणी कर्नाटक उच्च न्यायालयाने केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींविरोधात सुरु असलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. गेल्या महिन्यात या प्रकरणाची सुनावणी पार पडली, त्यावेळी न्यायालयाने ही टिप्पणी केली. या प्रकरणाचे सविस्तर आदेश मंगळवारी न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता विविध चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

इंडिया टुडेने बार अॅंण्ड बेंचच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दोन व्यक्ती दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका मशिदीत दाखल झाले होते. मशिदीत दाखल होताच त्यांनी मोठ्याने जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दोघांनाही अटक केली. तसेच त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ), कलम ४४७ आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Balasaheb Thorat phone call, Sudhir Mungantiwar,
थोरात यांचा थेट वनमंत्र्यांना फोन… वनमंत्र्यांनी दिले बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश! नेमके काय घडले?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Onion and grain trade stopped due to market committee strike nashik
कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
Badlapur encounter case, High Court question,
बदलापूर चकमक प्रकरण : शिंदेला लागलेली गोळी कशी सापडली नाही ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना प्रश्न
Badlapur accused police custody, Badlapur accused,
गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
Solapur, Abuse of girl Solapur, Solapur crime news,
सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…

हेही वाचा – गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींचं जामिनानंतर जंगी स्वागत; हारतुऱ्यांनी केला सत्कार!

आरोपींच्या वकिलांनी काय युक्तीवाद केला?

पोलिसांनी गुन्हा दाखल करताच आरोपींनी थेट कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, मशिद ही सार्वजनिक ठिकाणी असल्याने कलम ४४७ लागू होत नाही, असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच कलम २९५ (अ) हे धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित कलम आहे. त्यामुळे केवळ जय श्रीराम अशी घोषणा दिल्याने कुणाच्या भावना कशा दुखावतील? हे समजण्यापलिकडे आहे, असही तर्कही आरोपीच्या वकिलांकडून देण्यात आला. याशिवाय या परिसरात हिंदू आणि मुस्लीम नागरीक एकोप्याने राहतात, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा – Veer Savarkar : “वीर सावरकर ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे, त्यांनी..” काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद

उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

दरम्यान, आरोपींचा मशिदीत घोषणा देण्यामागचा उद्देश काय होता? हे तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला आरोपींची पोलीस कोठडी हवी आहे, अशी मागणी पोलिसांच्या वकिलांकडून करण्यात आली. मात्र, जय श्रीराम अशी घोषणा दिल्याने सार्वजनिक सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाला नाही, असं म्हणत न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रत्येक कृती ही भादंविच्या कलम २९५ (अ) चं उल्लंघन होऊ शकत नाही, जोपर्यंत सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत नाही. याप्रकरणात कुठेही सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आरोपींविरोधात पुढील कारवाईचे आदेश देणं म्हणजे एकप्रकारे कायद्याचं उल्लंघन असेल, अशी टिपणी न्यायालयाने केली.