लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. देशभरातील सर्वच जागांवरचा निकालाचा कल जवळपास पूर्ण कळलेला आहे. उत्तर प्रदेशने नेहमीच भाजपाला साथ दिली आहे. मात्र, यंदा समाजवादी पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे; तर भाजपाच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. सपाच्या यशाने इंडिया आघाडी मजबूत होणार अशातच समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरमुळे इंडिया आघाडीची डोकेदुखी वाढू शकते.
दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहे. २०१९ साली भाजपाला उत्तर प्रदेशातून जवळपास ६२ जागा मिळाल्याने केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाली. तर, समाजवादी पार्टीला पाच आणि बहुजन समाजवादी पार्टीला १० जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीतदेखील उत्तर प्रदेशात भाजपाला मोठे यश मिळेल, असे भाजपा नेते म्हणत होते. त्याशिवाय एक्झिट पोलदेखील भाजपाच्या बाजूने होते. मात्र, आजच्या निकालातून वेगळेच चित्र पुढे आले आहे.
लोकसभा निकालात ८० जागांपैकी समाजवादी पार्टीला ३६ जागा मिळाल्या आहे; तर काँग्रेस सात जागांवर पुढे आहे. इंडिया आघाडी जवळपास ४३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे यूपीत इंडिया आघाडीचे पारडे जड आहे.त्याशिवाय इंडिया आघाडीत समाजवादी पार्टी सर्वांत मोठा घटक पक्ष ठरला आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचे महत्त्व वाढले आहे. अशात उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी पंतप्रधान अखिलेश यादव, अशा आशयाची पोस्टर्स लावली आहेत. त्या पोस्टर्समुळे नव्या चर्चेला उधाण आले असून, सपा इंडिया आघाडीत खोडा तर घालणार नाही ना, अशीही चर्चा होत आहे.
(हे ही वाचा : पंतप्रधान मोदींच्या नावावर भाजपला स्पष्ट बहुमत नाही, आता मोदींनी…; अशोक गहलोत यांची जोरदार टीका )
‘पंतप्रधान अखिलेश यादव’ अशा आशयाचे पोस्टर्स लावून कार्यकर्ते उत्सव साजरा करताना दिसत आहेत. या उत्सत्वाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत सर्व समाजवादी पक्षाचे कार्यकर्त्यांने घोषणा करत जल्लोष साजरा करत आहे. या व्हायरल झालेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
येथे पाहा पोस्टर
सपा कार्यकर्त्याने लावले पोस्टर
हे पोस्टर सपा कार्यकर्ता रेहान खानने लावले असून, त्यात अखिलेश यादव यांना भारत आघाडीचे भावी पंतप्रधान म्हणत अभिनंदन करण्यात आले आहे. यूपीमध्ये समाजवादी पक्षाने ज्याप्रकारे चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सपाकडे यूपीमधील सर्वात मोठा पक्ष आणि देशात सर्वाधिक खासदार असलेला तिसरा पक्ष म्हणून पाहिले जाते. भाजपा पहिल्या क्रमांकावर, तर काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे.