वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. ही धक्कादायक घटना सहा महिन्यानंतर उघडकीस आली आहे.
मृत तरुणी वसईची असून तिचे नाव श्रद्धा वालकर आहे. तिने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे ते फ्रीजमध्ये ठेवले होते. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकजडे घेऊ न तो मेहरोलीच्या जंगलात फेकत असे.
याप्रकरणात तपासातून नवीन माहिती समोर येत आहे. श्रद्धाचा खून केल्यानंतर काही दिवसांनी आफताब दुसऱ्या एका महिलेच्या संपर्कात आला होता. जून-जुलै महिन्यात ही महिला आफताबच्या मेहरोली येथील घरी एक-दोनदा आली होती. या धक्कादायक बाब अशी की, जेव्हा ही महिला घरी आली होती, तेव्हा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते.
हेही वाचा : तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण…; मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा
हेही वाचा : “जर त्याने मृतदेहाचे तुकडे केले असतील, तर त्याचेही…”; श्रद्धाच्या वडिलांचा संताप, पहिल्यांदाच झाले व्यक्त
ज्या डेटिंग अॅपवरुन श्रद्धा आणि आफताबची ओळखी झाली. त्याच डेटिंग अॅपवरून आफताब या महिलेच्या संपर्कात आला होता. ही महिला मानसशास्त्रज्ञ होती. श्रद्धाच्या खूनानंतर या महिलेला घेऊन आफताब राहत असलेल्या घरी आला होता.
दरम्यान, श्रध्दाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ते ठेवण्यासाठी ३०० लिटरचा फ्रीज आफताबने विकत घेतला होता. मृतदेहाची दुर्गंधी कमी करण्यासाठी आफताब अगरबत्ती आणि रुम फ्रेशनरचा वापर करत असे. तसेच, श्रद्धाची हत्या केल्याचा संशय येऊ नये म्हणून तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरून आफताब मित्रांशी संवाद साधायचा, अशी माहिती तपासात समोर आली आहे.