श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. आपली लिव्ह-इन पार्टनर असलेल्या श्रद्धाचा गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलिसांनी या प्रकारामध्ये अनेक पुरावे आतापर्यंत गोळा केले असून श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध सुरु आहे. असं असतानाच तांत्रिक पुरावे गोळा करताना पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. आफताबने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचा वापर श्रद्धाची हत्या केल्यानंतर केल्याचं सुत्रांच्या हवाल्याने ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आफताबने श्रद्धाच्या नावाने असलेल्या मोबाईल क्रमांकावरुन ३०० लिटरचा फ्रीज मागवला होता. याच फ्रिजमध्ये त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर

आफताबने तीन ते चार मोबाईल क्रमांक वापरले होते. यापैकी एक क्रमांक श्रद्धाच्या नावाने रजिस्टर आहे असं पोलीस तपासात समोर आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबने वापलेलेल्या मोबाईल क्रमांकापैकी एक क्रमांक २६ ने तर दुसरा २० अंकाने संपतो. श्रद्धाचे सोशल मीडिया अकाऊंट वापरण्यासाठी या क्रमांकाचा आफताब वापर करत होता. आफताबने ४९ या आकड्याने संपणाऱ्या मोबाईल क्रमांकावरुन पॅकर्स आणि मुव्हर्स कंपनीशी संपर्क साधून वसईवरुन सामना दिल्लीला मागवलेलं. आफताब श्रद्दाची हत्या केल्यानंतर चार वेगवगेळ्या क्रमाकांचे सिम कार्ड वापरत होता.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “नॉन-व्हेज खाण्यासाठी आफताब श्रद्धावर बळजबरी करायचा, तिने नकार दिल्यास…”; नवा खुलासा

१८ या आकड्याने संपणारा मोबाईल क्रमांक आफताबने ३०० लिटरचा फ्रिज मागवण्यासाठी केला. याच फ्रिजमध्ये त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे भरुन ठेवले होते. मृतदेहाचे ३५ तुकडे या फ्रिजमध्ये जवळजवळ तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी ठेवले होते. रोज एक ते दोन तुकड्यांची तो जवळच्या जंगलामध्ये जाऊन विल्हेवाट लावत होता. श्रद्दाचं फेसबुक अकाऊंटही याच १८ आकड्याने संपणाऱ्या मोबाईल क्रमांकाशी संलग्न आहे. तर श्रद्धाच्याच नावाने असलेल्या आणि २० आकड्याने संपणाऱ्या अकाऊंटसंदर्भातील माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. या माहितीमधून अधिक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांच्या हाती लागू नये म्हणून त्याने अशापद्धतीने एकाच वेळी आलटून पालटून वेगवेगळे सिम कार्ड वापरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: समोर आलं त्या रात्रीचं धक्कादायक CCTV फुटेज! आफताब म्हणाला, “हे श्रद्धाच्या मृतदेहाचे…”

श्रद्धाच्या खात्यावरुन वळवले पैसे…
आफताबने श्रद्धाचा मृतदेह ठेवण्यासाठी जो ३०० लिटरचा फ्रिज घेतला तो श्रद्धाच्याच पैशातून घेण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. आफताब ने १८ मे रोजी श्रद्धाची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर १८ दिवस तो तिच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकत होता. पण ज्या दिवशी श्रद्धाची हत्या केली त्याच दिवशी तिच्या बॅंकेच्या खात्यातून आफताबने ५० हजार रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग केले होते. त्यानंतर २२ ते २६ मे पर्यंत तो एक हजार ते दोन हजार रुपये श्रद्धाच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने काढत होता अशी माहिती श्रद्धाच्या बँक खात्यांचा तपशीलामध्ये आढळून आली आहे. सुरुवातीला आफताबने २२ मे रोजी श्रद्धा घरातून निघून गेली असा जबाब नोंदवला होता. त्यावेळी श्रद्धा केवळ तिचा मोबाईल फोन घेऊन निघून गेल्याचा दावा आफताबने केला होता.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: समोर आलं त्या रात्रीचं धक्कादायक CCTV फुटेज! आफताब म्हणाला, “हे श्रद्धाच्या मृतदेहाचे…”

फ्रिज खरेदीही श्रद्धाच्याच खात्यावरील पैशांनी?
मात्र पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईल फोनची माहिती तांत्रिक तपासाच्या आधारे शोधली असता तिचा फोन मे महिना संपेपर्यंत सक्रीय होता आणि नंतर तो बंद झाला असं समजलं. मात्र श्रद्धा फोन घेऊन निघून गेल्याचा दावा आफताब कर होता तरी फोनचं लोकेशन मात्र मेहरोलीतील छत्तरपूरच दाखवलं जात होतं. खरं तर श्रद्धाच्या मोबाईलवरुन बँक अ‍ॅपच्या सहाय्याने आफताबने पैसे खात्यावर वळवले होते. हा व्यवहार झाला तेव्हा फोन मेहरोलीमधील छत्तरपूर परिसरात असल्याचंही तपासामध्ये दिसून आलं. पोलिसांनी असाही संशय व्यक्त केला आहे की, हत्येनंतर तिच्याच पैशाने त्याने फ्रीज, मृतदेह कापण्याचे हत्यार, घरात साफसफाईसाठी लागणारे साहित्य खरेदी केले असावे. पण या बाबत अद्याप कोणतीही पुष्टी दिली नाही. आता मोबाईल क्रमांकाशी संबंधित तांत्रिक माहितीच्या आधारे यासंदर्भातील पुरावे मिळण्याची शक्यता आहे.