वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची दिल्लीमध्ये तिच्याच प्रियकराने हत्या केल्यानंतरचा धक्कादायक घटनाक्रम सध्या चर्चेत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावालाने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केला. शनिवारी आफताबला अटक करण्यात आल्यानंतर रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता आफताबने श्रद्धाचा खून करण्यामागे नेमकं काय कारण होतं याबद्दलचा खुलासा करतानाच श्रद्धाला १८ मेच्या आधीच संपवण्याचा डाव होता असंही सांगितलं आहे. लग्नावरुन दोघांमध्ये वाद झाल्यानंतर गळा वाळून आफताबाने श्रद्धाचा खून केला. अशाच प्रकारचा वाद खूनाच्या दहा दिवस आधी झाला होता. त्यावेळेसही श्रद्धाला संपवण्याचा विचार आपल्या डोक्यात आला होता असं आफताबने कबुली जबाबामध्ये म्हटल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”

“त्याचवेळी मी तिला ठार मारणारच होतो पण ती फार भावूक झाली आणि रडू लागली. त्यामुळे मी तेव्हा काहीही केलं नाही,” असं आफताबने पोलिसांना सांगितलं. प्रेयसीची हत्या करणाऱ्या २८ वर्षीय आफताब अमिन पूनावाला याला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दक्षिण दिल्लीच्या छतरपूरच्या जंगलात नेले. याच जंगलात आपली प्रेयसी श्रद्धा वालकरच्या शरीराचे तुकडे फेकून दिल्याचे आफताबने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांकडून श्रद्धाच्या अवयवाच्या तुकड्यांचा सुमारे तीन तास शोध घेण्यात आला. दिल्ली पोलिसांना वेगवेगळय़ा ठिकाणांहून मानवी शरीराचे १३ तुकडे सापडले असून ते डीएनए चाचणीसाठी पाठवले जाणार आहेत. न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून ते तपासले गेल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

नक्की वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज

श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी २०१८ पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन तसेच सर्व समाजमाध्यमांची खाती बंद होती. यामुळे तिच्या वडिलांना माणिकपूर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये श्रद्धाने घर सोडून जाताना काय सांगितलं होतं याबद्दलची माहिती दिली आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी Google चा वापर, मोठा फ्रिज, अगरबत्ती अन्…; आफताबने नोंदवला जबाब

आफताब आणि श्रद्धा यांचे २०१८ पासून नातेसंबध होते. २०१९ पासून ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. आफताब आणि श्रद्धा २०१९ मध्ये नायगाव येथील यशवंत प्राईड किणी कॉम्पलेक्स मध्ये पती-पत्नी असल्याचे सांगून भाडय़ाने राहत होते. येथील भाडे करार संपल्याने त्यांनी जुलै २०२० मध्ये वसईच्या एव्हरशाईन परिसरात रिगल अपार्टमेंटमध्ये पुन्हा पती-पत्नी असल्याचे सांगून सदनिका भाडय़ाने घेतली होती. या सदनिकेचा करार ऑगस्ट २०२१ मध्ये संपला या नंतर त्याने वसईत आणखी एका ठिकाणी रूम घेतली आणि त्यानंतर तो दिल्लीत राहायला गेला होता.

Story img Loader