दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्याकांडाची संपूर्ण देशभरामध्ये चर्चा आहे. प्रियकर आफताब अमीन पूनावालाबरोबर लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाची प्रियकरानेच गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे मृतदेहाचे ३५ तुकडे फ्रिजमध्ये साठवून ठेवत तीन आठवड्यांमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावली. सहा महिन्यांनंतर या प्रकरणाचा खुलासा झाला असून या प्रकरणातील धक्कादायक तपशील टप्प्याटप्प्यात समोर येत आहे. मात्र हा तपशील अगदीच अंगावर काटा उभा राहील असा आहे.

पाहा फोटो >> Shraddha Murder Case Photos: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, कबुली जबाब अन् थेट ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस

Sandeep Deshpande
Sandeep Deshpande : “संजय राऊतांचा बुद्ध्यांक कमी झालाय, त्यामुळे त्यांना…”; राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला मनसेचं प्रत्युत्तर!
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
Ragini Nayak, Congress Spokesperson Ragini Nayak, ragini nayak critices mohan bhagwat, Mohan Bhagwat, Narendra Modi, anti women, Badlapur incident
‘संघप्रमुखांना केवळ विजयादशमीला ‘नारी-शक्ती’ आठवते, मोदींचे मौनही संतापजनक…’ काँग्रेसच्या प्रवक्त्याने……
rti activist assaulted by bjp ex female corporator
भाजपाच्या माजी नगरसेविकेकडून माहिती अधिकार कार्यकर्त्याला चपलेने चोप, महापालिकेच्या मुख्य इमारतीतील प्रकार
Sudha murty explain after getting troll
Sudha Murty Troll : रक्षाबंधनाच्या कथेवरून सुधा मूर्ती ट्रोल, नेटिझन्सना उत्तर देत म्हणाल्या, “माझा उद्देश…”
congress india bloc will raise manipur issue with full force in parliament says rahul gandhi
Rahul Gandhi: ‘UPSC च्या ऐवजी RSS द्वारे भरती’, IAS पदाचे खासगीकरण करून आरक्षण संपविण्याचा डाव; राहुल गांधींची टीका
national flag, quality, railway employees,
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हाती निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज

एकीकडे पोलीस तपास सुरु असतानाच दुसरीकडे या प्रकरणामध्ये नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. राजकीय पक्षांनीही या प्रकरणावर भाष्य करताना आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलं आहे. मात्र या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या एका नेत्याने केवळ अडनावावरुन आरोपी आफताबचा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याशी काही संबंध आहे का अशा अर्थाची पोस्ट केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आता भाजपाच्या या नेत्याने आपच्या नेत्याला थेट या प्रकरणी कायदेशीर नोटीसच पाठवली आहे.

नक्की वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज

आपचे आमदार नरेश बालयान यांनी ट्वीटवरुन श्रद्धा हत्याकाडांचा मुख्य आरोपी असलेल्या आफताब पूनावालाचा आणि भाजपाचे नेते शहजाद पूनावाला यांचं काही नातं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. सोशल मीडियावरही श्रद्धा हत्याकांडाचा पडसाद उमटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बालयान यांनी हे ट्वीट केलं आहे. “श्रद्धा वालकरची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावाला आणि भाजपाचे नेते शहजाद पूनावाला यांच्यात काय नातं आहे? लोक सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत आहेत. लोकांना जाणून घ्यायचं आहे. जर कोणतंही नातं नसेल तर शहजाद पूनावाला लपत का आहेत? प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यावं,” असं बालयान यांनी म्हटलं आहे. या ट्वीटनंतर शहजाद पूनावाला यांनी बालयान यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: …म्हणून मृतदेहाच्या ३५ तुकड्यांची विल्हेवाट लावताना आफताब वापरत होता श्रद्धाचं Instagram अकाऊंट

या ट्वीटनंतर शहजाद यांनी वकिलाच्या माध्यमातून बालयान यांना थेट नोटीस पाठवली आहे. “माझे वकील नमित सक्सेना यांनी नरेश बालयान यांच्याविरोधात गुन्हेगारी आणि सिव्हील याचिका दाखल केली आहे. कोणताही पुरावा नसताना निष्काळजीपणे बदनामी करणारी विधान केल्याबद्दल ही याचिका केली आहे. ही खोटी माहिती पसरवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरोधात मी कायदेशीर पावलं उचलणार आहे. या नोटीसची कॉपी खाली जोडलेली आहे,” असं शहजाद यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आम्ही कोळी हिंदू आणि तो मुस्लीम…”; श्रद्धाच्या वडिलांनी FIR मध्ये काय म्हटलं? घर सोडताना शेवटचे शब्द…

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी Google चा वापर, मोठा फ्रिज, अगरबत्ती अन्…; आफताबने दिली कबुली

बालयान यांनी या नोटीसच्या ट्वीटवरही रिप्लाय दिला आहे. “श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताब पूनावालाला समर्थन देण्यासाठी भाजपाचे नेते शहजाद पूनावाला मैदानात उतरले आहेत. श्रद्धासाठी आवाज उठवल्याबद्दल मला याचिकेची धमकी देत आहेत. शहजाद चुनावाला लक्षात ठेवा मी तुमच्या या याचिकांना घाबर नाही. मी तर लोकांचं म्हणणं मांडलं. मी श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणार,” असं बालयान यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Shraddha Walkar Murder: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या आफताबला ‘या’ वेब सिरीजमधून सुचली हत्येची कल्पना

दरम्यान, आज झालेल्या तपासादरम्यान पोलीस आरोपी आफताबला मेहरोलीच्या जंगलात घेऊन गेले. याच ठिकाणी आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे टाकले होते.